लुका 23
23
पिलातुस कडून येशूले प्रश्न
(मत्तय 27:1-2,11-14; मार्क 15:1-5; योहान 18:28-38)
1तवा ते सर्व मंडळी उठली, अन् येशूला पिलातुसच्या पासी घेऊन गेली. 2अन् ते त्याच्यावर असा आरोप लाऊ लागले, “आमी याले आमच्या देशाच्या लोकायले #23:2 रोमी अधिकाऱ्याच्या विरुद्धबयकवंताना अन् रोमी सम्राटाले कर दियाच्या बद्दल म्हणा करतांना, अन् आपल्या स्वताले ख्रिस्त अन् राजा हाय, असे म्हणतांना आयकलं.” 3तवा पिलातुसने त्याले विचारलं, “काय तू यहुदी लोकायचा यांचा राज्या हायस,” तवा येशूने उत्तर देलं, “तू म्हणतोस तसचं” 4तवा पिलातुस मुख्ययाजकायले अन् लोकायले म्हतलं, “मले या माणसात काईच दोष दिसत नाई.” 5पण ते आणखीनचं जोर देऊन म्हणू लागले, “हा गालील प्रांतापासून तर या ठिकाणा परेंत सगळ्या यहुदीया प्रांतात उपदेश देत-देत लोकायले उकसवतं हाय.” 6तवा हे आयकून पिलातुसन विचारलं, काय हा गालील प्रांताचा माणूस हाय? 7अन् त्याले हे समजलं कि तो हेरोद राजाच्या अधिकारातला हाय, तवा त्यानं त्याले हेरोदाच्या पासी पाठून देलं, कावून कि तो पण त्या दिवसात यरुशलेम शहरात होता.
येशूले हेरोद जवळ पाठवन
8हेरोद राजाले येशूले पावून खुपचं आनंद वाटला, कावून कि तो बऱ्याचं दिवसापासून त्याले पाह्यासाठी इच्छुक होता, अन् तो येशू पासून चमत्कार पाह्याची आशा करत होता. 9तवा त्याने त्याला बरेचं प्रश्न विचारले, पण त्यानं त्याले काईच उत्तर देलं नाई. 10अन् मुख्ययाजक व मोशेच्या नियमशास्त्राचे शिक्षक लोकं येशूवर लय आरोप लावत रायले. 11तवा हेरोद राजानं आपल्या शिपायासोबत त्याच्यावाला अपमान करून त्याची थट्टा केली, अन् आंगावर भडकीले कपडे घालून पिलातुसच्या इकडे परत पाठवलं. 12अन् त्याचं दिवशी पिलातुस अन् हेरोद राजा दोस्त मित्र झाले, याच्या आगोदर ते एकामेकाचे वैरी होते.
पिलातुस कडून येशूले मरण दण्ड
(मत्तय 27:15-26; मार्क 15:6-15; योहान 18:39-19:16)
13तवा पिलातुसन मुख्ययाजक अन् सरदारांना अन् लोकांना बलावून त्यायले म्हतलं. 14“तुमी या माणसाले लोकांना बयकवणारा ठरवून, माह्यापासी घेऊन आले हा, अन् पाहा, मी तुमच्या समोर त्याचीवाली चौकशी केली, पण ज्या गोष्टीचा तुमी त्याच्यावर दोष लावता, त्या गोष्टी विषयी मले त्याच्यावर काईच दोष सापडला नाई; 15हेरोद राजाले पण त्याच्यात दोष नाई सापडला, कावून कि त्यानं त्याले माह्यापासी परत पाठवले, अन् आयका, ह्या माणसानं मरण दंडायोग्य असे काईच केलं नाई. 16म्हणून त्याले मी कोडे मारून सोडून देतो.” 17आता पिलातुस हरएक फसहच्या सणाच्या दिवसाला यहुदी लोकायसाठी एका कैद्याले सोडत होता. 18तवा सगळे मिळून ओरडून बोलले, कि “याले मारून टाक, अन् आमच्यासाठी बरब्बाले सोडून दे.” 19तो नगरात झालेल्या कोण्यातरी दंग्या मध्ये खुनाच्या आरोपात जेलात टाकण्यात आला होता. 20मंग पिलातुसन येशूला सोडण्याच्या इच्छेन लोकांना परत समजावले. 21पण त्यायनं ओरडून म्हतलं, कि “त्याले वधस्तंभावर चढवा वधस्तंभावर चढवा.” 22आणखी पिलातुसन तिसऱ्यांदा त्यायले म्हतलं, “कावून, यानं असं काय वाईट केलं हाय? मी त्याच्यात मरणाच्या दंडायोग्य कोणताच दोष पायला नाई! म्हणून मी त्याले झोडपे देऊन सोडून देतो.” 23पण ते अजूनच ओरडून-ओरडून त्याच्या मांग लागले, कि त्याले वधस्तंभावर खिडून टाका, अन् त्यायचे ओरडून आयकल्या गेले. 24तवा पिलातुसने आज्ञा देली, कि त्यायच्या मांगण्याप्रमाणे करून टाका. 25त्यानं त्या माणसाले जो दंगल अन् खुनाच्या प्रकरणात जेलात टाकण्यात आला होता, त्याले ते मांगत होते, सोडून देलं, अन् येशूले त्यायच्या इच्छाच्या अनुसार त्यायले देऊन देलं.
येशूले वधस्तंभावर चढवण
(मत्तय 27:32-44; मार्क 15:21-32; योहान 19:17-19)
26जवा ते येशूले घेऊन जाऊन रायले होते, तवा त्यायनं शिमोन नावाच्या एका कुरेणी शहरात रायणारा माणूस जो गावातून येऊन रायला होता, त्याले धरलं अन् त्याच्यावर वधस्तंभ ठेवला, कि घेऊन येशूच्या मांग-मांग जावं. 27अन् लोकायची मोठी गर्दी त्याच्या मांग-मांग चालत होती, अन् बऱ्याचं बाया पण, त्याच्यासाठी छाती पिटून-पिटून दुख करत होत्या. 28तवा येशूनं त्यायच्या इकडे फिरून म्हतलं, “हे यरुशलेम शहराच्या पोरीहो, माह्याल्यासाठी रडू नका, पण आपल्या अन् आपल्या लेकरायसाठी रडा. 29कावून कि, असे दिवस येत हायत, कि ज्याच्यात लोकं म्हणतीन, धन्य हाय त्या बाया ज्यायले कधी लेकरं नाई होते, धन्य हाय त्या बाया ज्यायनं लेकरायले जन्म नाई देला. अन् ज्यायनं कधी दुध नाई पाजले. 30त्यावाक्ती ते लोकं पहाडाले म्हणतीन, कि आमच्यावर पडून जा, अन् टेकड्याले म्हणतीन, आमाले झाकून टाका.
31कावून कि जवा ते धर्मी माणसा सोबत असं करतेत, तर कल्पना करा जे लोकं ह्या दंडाच्या योग्य हाय त्यायचं काय होईन.” 32त्यायनं अजून दोन माणसायले पण, जे अपराधी होते येशूच्या संग वधस्तंभावर मरनासाठी नेले. 33जवा ते त्या जागी आले, ज्याले कवटीची जागा असं म्हणतात, तवा त्यायनं तती येशूले अन् त्या अपराध्यायले पण एकाले येशूच्या उजवीकडे अन् दुसऱ्याले येशूच्या डावीकडे वधस्तंभावर चढवलं. 34तवा येशूनं म्हतलं, “हे देवबापा, त्यायले क्षमा कर, कावून कि त्यायले ठाऊक नाई कि ते काय करत हाय,” अन् त्यायनं चिठ्ठ्या टाकून त्या वाटून घेतल्या
35अन् सर्व लोकं उभे राऊन पायतं होते, अन् सरदार पण थट्टा करून-करून म्हणत होते, कि “यानं दुसऱ्याले तारलं, जर हा देवाचा ख्रिस्त हाय, अन् त्याचा निवडलेला हाय, तर स्वताले वाचवले पायजे.” 36अन् शिपाई पण त्याच्यावाल्या जवळ येऊन त्याले कडू रस देऊन त्यांची थट्टा करत होते. 37“जर तू यहुदी लोकायचा यांचा राजा हायस, तर आपल्या स्वताले वाचव.” 38अन् त्याच्यावर एक दोषपत्र पण लिवून ठेवलं कि हा “यहुदी लोकायचा राजा हाय.”
वधस्तंभावर मन फिरवणारा कुकर्मी
39जे अपराधी चढवले होते, त्यायच्यातून एकानं त्याच्यावाली निंदा करून म्हतलं, जर “तू ख्रिस्त असशीन तर स्वताले अन् आमाले पण वाचव.” 40यावर दुसऱ्या अपराध्याने त्याले दटावून म्हतलं, “काय तू देवाले पण भेत नाई? तू पण तर तोच दंड भोगत हाय. 41अन् आमी तर न्यायानुसार दंड भोगत हाय, कावून कि आमाले तर आमच्या कामाच्या अनुसार प्रतिफळ भेटत हाय, पण याने कोणतचं बेकार काम केलं नाई.” 42तवा त्यानं येशूले म्हतलं, “हे प्रभू जवा तू एका राजा सारखा आपल्या राज्यात येशीन, तवा माह्याली आठवण काडजोकं.” 43तवा येशूने त्याले म्हतलं, “मी तुले खरं-खरं सांगतो, कि आजचं तू माह्याल्या संग स्वर्गाच्या लोकायमध्ये रायशीन.”
येशूच जीव सोडणे
(मत्तय 27:45-56; मार्क 15:33-41; योहान 19:28-30)
44अन् दुपार पासून, तर जवळपास बारा ते तीन वाजेपर्यंत सगळ्या देशात अंधार पडला. 45अन् सूर्याने ऊजीळ देने बंद केले, अन् देवळातला जाळा पर्दा जो सगळ्यायच्या देखत देवाच्या उपस्थितीत प्रवेश कऱ्याले थांबवत होता, तो वरून खाल परेंत फाटला. 46तवा येशूने मोठ्याने ओरडून म्हतलं, “हे देवबापा, मी आपला आत्मा तुह्या हातात सोपून देतो,” अन् हे म्हणून जीव सोडून देला. 47सुभेदाराने जे काई झाले होते ते पाऊन देवाची बढाई केली, अन् म्हतलं “खरचं हा माणूस धर्मी न्यायी होता.” 48अन् जे लोकं हे पाह्याले एकत्र झाले होते, हि घटना पाऊन आपली छाती पिटून-पिटून घरी वापस गेली, हे दाखवाले कि ते लय दुखी हायेत. 49अन् येशूचे सगळे मित्र व ज्या बाया गालील प्रांतातून त्याच्यावाल्या मांगून चालत आल्या होत्या, दूर उभ्या राहून जे काई झालं ते पायतं होत्या.
अरिमतियाहच्या योसेफ कडून येशूले गाडण
(मत्तय 27:57-61; मार्क 15:42-47; योहान 19:38-42)
50-51यहुदीया प्रांताचे एक अरीमतियाह शहराचा एक योसेफ नावाचा माणूस होता, तो एक सभ्य अन् चांगला होता. अन् देवाच्या राज्य यायची वाट पायत होता; जरी तो यहुदी महासभेचा सदस्य होता, पण तो त्यायच्या निर्णयाले अन् कारवाई पासून सहमत नाई होता. 52त्यानं पिलातुस पासी जाऊन येशूचे मेलेले शरीर मांगतलं, 53अन् ते शरीर खाली उतरून मलमलच्या चादरीत गुंडाऊन, एका कबरेत ठेऊन देलं, जे एका टेकडीत खोदलेली होती; अन् त्याच्या आगुदर तती कोणालेच ठेवलं नव्हत. 54तो आरामाच्या दिवसाची तयारी करण्याचा शुक्रवार दिवस होता, अन् आरामाचा दिवस सुरु होणार होता. 55अन् त्या बाया जे त्याच्या संग गालील प्रांतातून आल्या होत्या, ते मांग-मांग येऊन हे पायत होत्या, कि त्याचवालं शरीर कसं ठेवत हाय. 56अन् तवा त्या आपल्या घरी वापस जाऊन सुगंधित वस्तु अन् येशूच्या शरीरावर लाव्यासाठी तेल तयार केलं, अन् आरामाच्या दिवशी त्यायनं मोशेच्या नियमशास्त्राच्या आज्ञाच्या अनुसार आराम केला.
Voafantina amin'izao fotoana izao:
लुका 23: VAHNT
Asongadina
Hizara
Dika mitovy
Tianao hovoatahiry amin'ireo fitaovana ampiasainao rehetra ve ireo nasongadina? Hisoratra na Hiditra
Varhadi (वऱ्हाडी) Bible by The Love Fellowship is licensed under Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 License.