1
मत्तय 5:15-16
पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
दिवा लावून मापाखाली ठेवत नसतात, दिवठणीवर ठेवतात म्हणजे तो घरातल्या सर्वांना प्रकाश देतो. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचा गौरव करावा.
तुलना करा
एक्सप्लोर करा मत्तय 5:15-16
2
मत्तय 5:14
तुम्ही जगाचा प्रकाश आहात; डोंगरावर वसलेले नगर लपू शकत नाही.
एक्सप्लोर करा मत्तय 5:14
3
मत्तय 5:8
‘जे अंत:करणाचे शुद्ध’ ते धन्य, कारण ते देवाला पाहतील.
एक्सप्लोर करा मत्तय 5:8
4
मत्तय 5:6
जे नीतिमत्त्वाचे भुकेले व तान्हेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील.
एक्सप्लोर करा मत्तय 5:6
5
मत्तय 5:44
मी तर तुम्हांला सांगतो, तुम्ही आपल्या वैर्यांवर प्रीती करा, [जे तुम्हांला शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या, जे तुमचा द्वेष करतात त्यांचे बरे करा] आणि जे तुमचा छळ करतात [व तुमच्या पाठीस लागतात] त्यांच्यासाठी प्रार्थना करा.
एक्सप्लोर करा मत्तय 5:44
6
मत्तय 5:3
“जे आत्म्याने ‘दीन’ ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.
एक्सप्लोर करा मत्तय 5:3
7
मत्तय 5:9
जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील.
एक्सप्लोर करा मत्तय 5:9
8
मत्तय 5:4
‘जे शोक करीत आहेत’ ते धन्य, कारण ‘त्यांचे सांत्वन करण्यात येईल.’
एक्सप्लोर करा मत्तय 5:4
9
मत्तय 5:10
नीतिमत्त्वाकरता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.
एक्सप्लोर करा मत्तय 5:10
10
मत्तय 5:7
जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया होईल.
एक्सप्लोर करा मत्तय 5:7
11
मत्तय 5:11-12
माझ्यामुळे जेव्हा लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुमच्याविरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडीने बोलतील तेव्हा तुम्ही धन्य. आनंद करा, उल्लास करा, कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे; कारण तुमच्यापूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचा त्यांनी तसाच छळ केला.
एक्सप्लोर करा मत्तय 5:11-12
12
मत्तय 5:5
‘जे सौम्य’ ते धन्य, कारण ‘ते पृथ्वीचे वतन भोगतील.’
एक्सप्लोर करा मत्तय 5:5
13
मत्तय 5:13
तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात; पण जर मिठाचा खारटपणाच गेला तर तो खारटपणा त्याला कशाने आणता येईल? पुढे ते बाहेर फेकले जाऊन माणसांच्या पायांखाली तुडवले जाण्यापलीकडे त्याचा कसलाच उपयोग नाही.
एक्सप्लोर करा मत्तय 5:13
14
मत्तय 5:48
ह्यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे ‘तुम्ही पूर्ण व्हा.’
एक्सप्लोर करा मत्तय 5:48
15
मत्तय 5:37
तर तुमचे बोलणे, होय तर होय, नाही तर नाही, एवढेच असावे; ह्याहून जे अधिक ते वाइटापासून आहे.
एक्सप्लोर करा मत्तय 5:37
16
मत्तय 5:38-39
‘डोळ्याबद्दल डोळा व दाताबद्दल दात’ असे सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हांला सांगतो, दुष्टाला अडवू नका. जो कोणी तुझ्या उजव्या गालावर मारतो, त्याच्याकडे दुसरा गाल कर
एक्सप्लोर करा मत्तय 5:38-39
17
मत्तय 5:29-30
तुझा उजवा डोळा तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो उपटून टाकून दे; कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात टाकले जावे ह्यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे. तुझा उजवा हात तुला पापास प्रवृत्त करत असेल तर तो तोडून टाकून दे; कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात पडावे, ह्यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे.
एक्सप्लोर करा मत्तय 5:29-30
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ