देवाने तुम्हा आम्हास आपल्या गौरवासाठी व सात्विकतेसाठी बोलावले आहे, त्याच्या ओळखीच्या द्वारे, त्याच्या दैवी सामर्थ्याने जीवनास व सुभक्तीस आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी दिल्या आहेत. त्यांच्यायोगे मोलवान व अति महान वचने देण्यात आली आहेत; ह्यासाठी की, त्यांच्याद्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता चुकवून दैवी स्वभावाचे भागीदार व्हावे.