1
निर्ग. 20:2-3
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
मी परमेश्वर तुझा देव आहे. ज्याने तुला मिसर देशातून, गुलामगिरीतून सोडवून आणले. माझ्यासमोर तुला इतर कोणतेही दुसरे देव नसावेत.
तुलना करा
एक्सप्लोर करा निर्ग. 20:2-3
2
निर्ग. 20:4-5
तू आपल्यासाठी कोरीव मूर्ती करू नकोस; वर आकाशातील, खाली पृथ्वीवरील व पृथ्वीखालच्या जलातील कशाचीही प्रतिमा करू नकोस; त्यांची सेवा करू नको; किंवा त्यांच्या पाया पडू नकोस; कारण मी परमेश्वर तुझा देव ईर्ष्यावान देव आहे. जे माझा विरोध करतात, त्यांच्या मुलांना तिसऱ्या चौथ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अपराधाबद्दल शिक्षा करतो
एक्सप्लोर करा निर्ग. 20:4-5
3
निर्ग. 20:12
आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख म्हणजे त्यामुळे परमेश्वर तुझा देव जो देश तुला देत आहे त्या देशात तू चिरकाळ राहशील.
एक्सप्लोर करा निर्ग. 20:12
4
निर्ग. 20:8
शब्बाथ दिवस हा पवित्र दिवस म्हणून पाळण्याची आठवण ठेव
एक्सप्लोर करा निर्ग. 20:8
5
निर्ग. 20:7
तुझा देव परमेश्वर याचे नाव तू व्यर्थ घेऊ नकोस; कारण जो परमेश्वराचे नाव व्यर्थ घेईल त्याची तो गय करणार नाही.
एक्सप्लोर करा निर्ग. 20:7
6
निर्ग. 20:9-10
सहा दिवस श्रम करून तू तुझे कामकाज करावेस; परंतु सातवा दिवस तुझा देव परमेश्वर याचा शब्बाथ आहे, म्हणून त्या दिवशी तू, तुझा पुत्र, तुझी कन्या, तुझे दास व दासी यांनी तसेच तुझे पशू, किंवा तुझ्या वेशीत राहणाऱ्या परकीयांनीही कोणतेही कामकाज करु नये
एक्सप्लोर करा निर्ग. 20:9-10
7
निर्ग. 20:17
“तू आपल्या शेजाऱ्याच्या घराचा लोभ धरू नकोस; आपल्या शेजाऱ्याच्या पत्नीचा लोभ धरू नकोस; आपल्या शेजाऱ्याचा दासदासी, बैल, गाढव, किंवा त्याच्या कोणत्याही वस्तूचा लोभ धरु नकोस.”
एक्सप्लोर करा निर्ग. 20:17
8
निर्ग. 20:16
आपल्या शेजाऱ्याविरूद्ध खोटी साक्ष देऊ नकोस.
एक्सप्लोर करा निर्ग. 20:16
9
निर्ग. 20:14
व्यभिचार करू नकोस.
एक्सप्लोर करा निर्ग. 20:14
10
निर्ग. 20:13
खून करू नकोस.
एक्सप्लोर करा निर्ग. 20:13
11
निर्ग. 20:15
चोरी करू नकोस.
एक्सप्लोर करा निर्ग. 20:15
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ