मग परमेश्वर गिदोनाला म्हणाला, “अजूनही लोक फार आहेत; तू त्यांना खाली पाण्याजवळ ने, आणि तेथे मी तुझ्यासाठी त्यांची कसोटी घेईन. ज्याच्याविषयी मी तुला सांगेन, त्याने तुझ्याबरोबर यावे तो तुझ्याबरोबर जावो, आणि ज्या प्रत्येकाविषयी मी तुला सांगेन की, त्याने तुझ्याबरोबर न यावे, तो न जावो.”