त्यांचे व त्यांच्यानंतर त्यांच्या वंशजानी त्यांच्या चांगल्यासाठी प्रत्येक दिवशी माझा आदर करावा म्हणून मी त्यांना एकच हृदय व एकच मार्ग देईन. आणि मी त्याजशी सर्वकाळचा करार करीन. तो असा की, मी त्यांचे हित करण्यापासून माघार घेणार नाही. मी आपला आदर त्यांच्या मनात उत्पन्न करीन, म्हणजे ते मजपासून माघार घेणार नाहीत.