मग ती स्त्री पुन्हा येशूकडे आली, ती येशूच्या पाया पडली व म्हणाली, “प्रभूजी, मला मदत करा.” परंतु त्याने म्हटले, “मुलाची भाकर घेऊन कुत्र्यास टाकणे योग्य नाही.” ती स्त्री म्हणाली, “होय प्रभूजी, परंतु तरीही कुत्रीही आपल्या धन्याच्या मेजावरून पडलेला चूरा खातात.”