1
मत्त. 16:24
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी
तेव्हा येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, “जर कोणी माझ्यामागे येऊ इच्छित असेल तर त्याने स्वतःला नाकारावे आणि आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व माझ्यामागे यावे.
तुलना करा
एक्सप्लोर करा मत्त. 16:24
2
मत्त. 16:18
आणखी मी तुला असे सांगतो की, तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन आणि तिच्यापुढे मृतलोकाच्या द्वारांचे कांहींच चालणार नाही.
एक्सप्लोर करा मत्त. 16:18
3
मत्त. 16:19
मी तुला स्वर्गाच्या राज्याच्या किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल आणि पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गात मोकळे केले जाईल.”
एक्सप्लोर करा मत्त. 16:19
4
मत्त. 16:25
कारण जो कोणी आपला जीव वाचवू इच्छितो तो त्यास गमावील पण जो माझ्याकरिता आपला जीव गमावील तो त्यास मिळवील.
एक्सप्लोर करा मत्त. 16:25
5
मत्त. 16:26
जर मनुष्याने सर्व जग मिळविले आणि आपला जीव गमावला तर त्यास काय लाभ? किंवा मनुष्य आपल्या जीवाचा काय मोबदला देईल?
एक्सप्लोर करा मत्त. 16:26
6
मत्त. 16:15-16
मग येशू त्यांना म्हणाला, “पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणता?” शिमोन पेत्राने उत्तर दिले, “तू ख्रिस्त, जिवंत देवाचा पुत्र आहेस.”
एक्सप्लोर करा मत्त. 16:15-16
7
मत्त. 16:17
येशू म्हणाला, “शिमोन, बार्योना, तू धन्य आहेस कारण रक्त व मांस यांनी तुला हे उघड केले नाही, तर माझा पिता जो स्वर्गात आहे त्याने तुला हे उघड केले.
एक्सप्लोर करा मत्त. 16:17
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ