आकाश आणि पृथ्वी यांना तुमच्याविरुद्ध साक्षीला ठेवून आज मी तुमच्यापुढे जीवन आणि मृत्यू, आशीर्वाद आणि शाप, ही ठेवली आहेत. म्हणून तुम्ही जीवन निवडून घ्यावे म्हणजे तुम्ही आणि तुमची मुले जिवंत राहतील, आणि तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वरावर प्रीती करावी, त्यांची वाणी ऐकावी आणि त्यांना बिलगून राहावे. कारण याहवेहच तुमचे जीवन आहेत आणि अब्राहाम, इसहाक आणि याकोब या तुमच्या पूर्वजांना वचन दिलेल्या देशात तेच तुम्हाला दीर्घायुष्य देतील.