तुझ्या तारुण्याच्या दिवसात
तुझ्या निर्माणकर्त्याचे स्मरण कर,
आणि जोपर्यंत कष्टाचे दिवस येत नाहीत
आणि अशी वर्षे येत नाहीत जेव्हा तुम्ही म्हणाल,
“मला त्यांच्यामध्ये काही संतोष नाही”—
जोपर्यंत सूर्य आणि प्रकाश,
आणि चंद्र आणि तारे अंधकारमय होत नाहीत,
पावसानंतर ढग परत जात नाहीत