1
उपदेशक 11:9
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
जो तू तरुण आहेस, तो तू तारुण्यात आनंदी राहा, तुझ्या तारुण्याच्या दिवसांत तुझे हृदय तुला आनंद देवो. तुझे हृदय जे काही इच्छिते आणि तुझे नेत्र जे काही पाहतात त्याप्रमाणे कर, परंतु हे लक्षात असू दे की परमेश्वर या सर्वांनुसार तुझा न्याय करेल.
तुलना करा
एक्सप्लोर करा उपदेशक 11:9
2
उपदेशक 11:10
म्हणून तू आपल्या मनातून चिंता नाहीशी कर आणि आपल्या देहातील वाईट गोष्टी काढून टाक, कारण तारुण्य आणि जोश निरर्थक आहेत.
एक्सप्लोर करा उपदेशक 11:10
3
उपदेशक 11:4
जो वार्याकडे पाहत राहतो तो पेरणी करणार नाही आणि जो ढगांना पाहत राहतो तो कापणी करत नाही.
एक्सप्लोर करा उपदेशक 11:4
4
उपदेशक 11:5
जसे वार्याचे मार्ग, किंवा आईच्या उदरात गर्भ कसा वाढतो हे तुला कळत नाही, तसेच परमेश्वर जे सर्वांचे निर्माणकर्ता आहेत, त्यांची कृत्येही तुला समजू शकत नाहीत.
एक्सप्लोर करा उपदेशक 11:5
5
उपदेशक 11:6
तू आपले बी सकाळी पेर, आणि संध्याकाळीही आपल्या हातांना विसावा देऊ नकोस. कारण त्यातील कोणते फलदायी होईल, हे किंवा ते, किंवा ते दोन्हीही चांगले फळ देतील, हे तुला ठाऊक नाही.
एक्सप्लोर करा उपदेशक 11:6
6
उपदेशक 11:2
सात उपक्रमांमध्ये, होय, आठांमध्ये गुंतवणूक कर; कारण पृथ्वीवर कोणती दुर्घटना घडेल, हे तुला ठाऊक नाही.
एक्सप्लोर करा उपदेशक 11:2
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ