YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उपदेशक 11

11
अनेक उद्योगात निवेश कर
1तू आपल्या धान्याची समुद्रावरून निर्यात#11:1 किंवा भाकर पाण्यावर टाक कर;
पुष्कळ दिवसांनी त्याचा मोबदला तुला लाभेल.
2सात उपक्रमांमध्ये, होय, आठांमध्ये गुंतवणूक कर;
कारण पृथ्वीवर कोणती दुर्घटना घडेल, हे तुला ठाऊक नाही.
3जर मेघ पाण्याने भरलेले आहेत,
तर ते पृथ्वीवर पाऊस ओततात.
झाड दक्षिणेला पडो की उत्तरेला,
ज्या ठिकाणी ते पडते, तिथेच पडलेले राहते.
4जो वार्‍याकडे पाहत राहतो तो पेरणी करणार नाही
आणि जो ढगांना पाहत राहतो तो कापणी करत नाही.
5जसे वार्‍याचे मार्ग,
किंवा आईच्या उदरात गर्भ कसा वाढतो हे तुला कळत नाही,
तसेच परमेश्वर जे सर्वांचे निर्माणकर्ता आहेत,
त्यांची कृत्येही तुला समजू शकत नाहीत.
6तू आपले बी सकाळी पेर,
आणि संध्याकाळीही आपल्या हातांना विसावा देऊ नकोस.
कारण त्यातील कोणते फलदायी होईल,
हे किंवा ते,
किंवा ते दोन्हीही चांगले फळ देतील, हे तुला ठाऊक नाही.
तारुण्यात आपल्या निर्माणकर्त्याचे स्मरण कर
7प्रकाश मधुर आहे,
आणि सूर्य पाहणे डोळ्यांना रम्य आहे.
8एखादा मनुष्य कितीही दीर्घायुष्य जगो,
त्या सर्वांचा त्याने आनंद घ्यावा.
परंतु त्यांनी अंधकाराचे दिवस आठवावे,
कारण ते पुष्कळ असतील.
येणारे सर्वकाही व्यर्थ आहे.
9जो तू तरुण आहेस, तो तू तारुण्यात आनंदी राहा,
तुझ्या तारुण्याच्या दिवसांत तुझे हृदय तुला आनंद देवो.
तुझे हृदय जे काही इच्छिते
आणि तुझे नेत्र जे काही पाहतात त्याप्रमाणे कर,
परंतु हे लक्षात असू दे
की परमेश्वर या सर्वांनुसार तुझा न्याय करेल.
10म्हणून तू आपल्या मनातून चिंता नाहीशी कर
आणि आपल्या देहातील वाईट गोष्टी काढून टाक,
कारण तारुण्य आणि जोश निरर्थक आहेत.

सध्या निवडलेले:

उपदेशक 11: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन