YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उपदेशक 10

10
1जशा मेलेल्या माशा सुगंधी तेलाला दुर्गंधी बनवतात,
तसेच जराशी मूर्खता सुज्ञान आणि सन्मानावर भारी पडते.
2सुज्ञानाचे अंतःकरण उजवीकडे नेते, म्हणजे त्याला सत्कार्यास प्रवृत्त करते,
पण मूर्खाचे अंतःकरण त्याला डावीकडे, म्हणजे दुष्ट कृत्यांकडे ओढून नेते.
3मूर्ख व्यक्ती रस्त्याने चालत असला तरी,
त्यांना बुद्धीचा अभाव असतो,
आणि सर्वांना दाखवितात की ते किती मूर्ख आहेत.
4जर तुझ्या अधिपतीचा राग तुझ्यावर भडकला,
तर आपले स्थान सोडू नकोस;
विनम्रता मोठे अपराध शांतविते.
5सूर्याखाली मी एक दुष्टता पाहिली आहे,
अशी चूक की जी अधिकार्‍यांकडून घडते.
6मूर्खांना मोठी पदे दिले जातात,
आणि श्रीमंतांना खालील स्थान दिले जाते.
7गुलामांना मी घोड्यांवर स्वार झालेले पाहिले आहे,
आणि राजपुत्र गुलामाप्रमाणे पायी चालतात.
8जो खड्डा खणतो तोच तिच्यात पडेल.
जो कुंपण मोडतो त्याला सर्प चावेल.
9जो खडक खोदतो त्याला त्यापासून दुखापत होते;
जो लाकडे फोडतो त्याला त्यापासून धोका होऊ शकेल.
10जर कुर्‍हाड बोथट असली,
आणि तिची धार तीक्ष्ण नसेल,
तर श्रम अधिक लागते,
परंतु निपुणता यश आणेल.
11साप वश होण्यापूर्वी जर गारुड्याला चावला,
तर गारुड्याला त्याचा काही उपयोग नाही.
12सुज्ञ व्यक्तीच्या मुखातील शब्द कृपेचे असतात,
पण मूर्खाचे ओठ त्याचाच नाश करतात.
13त्यांचे बोलणे प्रथम मूर्खतेचे असते;
आणि त्यांच्या बोलण्याचा शेवट दुष्टाईच्या वेडेपणाने होतो;
14मूर्ख शब्द वाढवून बोलतात.
पुढे काय घडणार ते कोणी जाणत नाही;
त्यांच्यानंतर काय होणार असे एखाद्याला कोणी व्यक्ती सांगू शकणार काय?
15मूर्खांचे श्रम त्यांना थकवून टाकतात;
नगराकडे जाणारी वाट त्यांना ठाऊक नसते.
16धिक्कार असो त्या देशाचा ज्याचा राजा एक दास#10:16 किंवा मूल आहे,
आणि ज्या देशाचे राजपुत्र सकाळीच मेजवानी सुरू करतात.
17धन्य आहे तो देश ज्याचा राजा उच्चकुळात जन्मलेला आहे
आणि ज्या देशाचे राजपुत्र नशेसाठी नव्हे तर
शक्तीसाठी योग्य समयी आपले भोजन करतात.
18आळशीपणामुळे घराचे छत पडते;
आळशाच्या हातांमुळे घर गळू लागते.
19मनोरंजनासाठी मेजवानी असते,
द्राक्षारस जीवनाला आनंदित बनविते,
आणि पैशाने सर्व समस्याचे समाधान होते.
20राजाला आपल्या मनात देखील शाप देऊ नको,
श्रीमंताला सुद्धा आपल्या शयनकक्षातून शाप देऊ नकोस,
कारण आकाशातील एक पक्षी तुझे शब्द घेऊन जाईल,
आणि आपल्या पंखाने उडत जाऊन तू काय बोललास याचा अहवाल देईल.

सध्या निवडलेले:

उपदेशक 10: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन