1
उत्पत्ती 45:5
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
तुम्ही मला अशा रीतीने वागविले म्हणून वाईट वाटून घेऊ नका व त्रागा करून घेऊ नका, कारण तुमचे जीव वाचविण्याकरिता परमेश्वरानेच मला तुमच्यापुढे इकडे पाठविले.
तुलना करा
एक्सप्लोर करा उत्पत्ती 45:5
2
उत्पत्ती 45:8
“म्हणजे आता तुम्ही नव्हे तर खुद्द परमेश्वरानेच मला इकडे पाठविले. त्यांनीच मला फारोहचा सल्लागार, त्याच्या घराण्याचा व्यवस्थापक आणि संपूर्ण इजिप्त देशाचा अधिपती केले आहे.
एक्सप्लोर करा उत्पत्ती 45:8
3
उत्पत्ती 45:7
परंतु पृथ्वीवर जे उरले आहेत, त्या तुम्हाला वाचवण्यासाठी आणि मोठ्या मुक्तिद्वारे तुमचे जीवन सुरक्षित करण्यासाठी परमेश्वराने मला तुमच्या आधी इथे पाठवले आहे.
एक्सप्लोर करा उत्पत्ती 45:7
4
उत्पत्ती 45:4
तेव्हा योसेफाने आपल्या भावांना म्हटले, “माझ्याजवळ या!” ते जवळ आल्यावर तो त्यांना म्हणाला, “ज्या भावाला विकून तुम्ही इजिप्त देशात पाठवून दिले होते, तो मी तुमचा भाऊ योसेफ आहे!
एक्सप्लोर करा उत्पत्ती 45:4
5
उत्पत्ती 45:6
दुष्काळ पडून आता दोनच वर्षे झाली आणि अद्यापही पाच वर्षे आहेत. त्या काळात नांगरणी व कापणी अजिबात होणार नाही.
एक्सप्लोर करा उत्पत्ती 45:6
6
उत्पत्ती 45:3
तेव्हा योसेफ आपल्या भावांना म्हणाला, “मी योसेफ आहे! माझे वडील अद्याप जिवंत आहेत काय?” परंतु त्याचे भाऊ इतके घाबरले होते की त्यांच्या मुखातून एकही शब्द बाहेर पडेना.
एक्सप्लोर करा उत्पत्ती 45:3
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ