वास्तविक आतापर्यंत तुम्ही शिक्षक व्हायला पाहिजे होते, पण त्याऐवजी कोणीतरी तुम्हालाच परमेश्वराच्या वचनांची मूलतत्वे परत शिकविण्याची गरज आहे. तुम्हाला दूध हवे, जड अन्न नव्हे! आणि जो कोणी दुधावर जगतो तो अजून तान्हेबाळ आहे आणि तान्हेबाळ असल्यामुळे नीतिमत्वाच्या शिक्षणाविषयी अपरिचित आहे.