नोहाच्या दिवसात जशी परिस्थिती होती, तशीच मानवपुत्र येण्याच्या वेळी होईल. जलप्रलय येण्यापूर्वी, नोहा प्रत्यक्ष तारवात गेला, त्या दिवसापर्यंत लोक खातपीत होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते. आपले काय होणार आहे हे त्यांना माहीत नव्हते, मग एकाएकी जलप्रलय आला आणि त्या सर्वांनाच जलसमाधी मिळाली. मानवपुत्र परत येईल त्यावेळीही अगदी असेच होईल.