मी त्यांना म्हणालो, “यरुशलेमच्या वेशी सूर्य बराच उष्ण होईपर्यंत उघडण्यात येऊ नयेत. पहारेकरी कामावर असतानाच, सर्व वेशींना अडसर लावून त्या बंद करण्यात याव्या. तसेच यरुशलेममधील रहिवाशांनाच पहारेकरी म्हणून नेमावे. काहीजण त्यांच्या चौकीवर तर काहींनी त्यांच्या घराजवळच्या भागाचे रक्षण करावे.”