1
स्तोत्रसंहिता 103:2
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती
हे माझ्या जिवा, याहवेहचे स्तवन कर; त्यांनी केलेले उपकार कधीही विसरू नको.
तुलना करा
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 103:2
2
स्तोत्रसंहिता 103:3-5
जे तुझ्या सर्व अपराधांची क्षमा करतात, जे तुझे सर्व रोग बरे करतात. जे नाशाच्या दरीतून तुझी सुटका करतात; आपल्या प्रीतीचा आणि दयेचा तुला मुकुट घालतात. जे तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करतात; म्हणून गरुडासारखे तुझ्या तारुण्याचे नवीनीकरण होते.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 103:3-5
3
स्तोत्रसंहिता 103:1
माझ्या जिवा, याहवेहचे स्तवन कर; माझ्या संपूर्ण अंतरात्म्या, त्यांच्या पवित्र नामाचे स्तवन कर.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 103:1
4
स्तोत्रसंहिता 103:13
जशी पित्याची करुणा त्याच्या लेकरांवर असते, तसे त्यांचे भय बाळगणार्यांसाठी याहवेह कोमलहृदयी व सहानुभूतीने भरलेले आहेत.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 103:13
5
स्तोत्रसंहिता 103:12
पूर्वेपासून पश्चिम जेवढी दूर आहे, तेवढे त्यांनी आमचे अपराध आम्हांपासून दूर केले आहेत.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 103:12
6
स्तोत्रसंहिता 103:8
याहवेह कृपावान व करुणामय आहेत, ते मंदक्रोध व प्रीतीने विपुल आहेत.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 103:8
7
स्तोत्रसंहिता 103:10-11
ते आपल्या अपराधास यथायोग्य असा दंड देत नाहीत, अथवा आपल्या कुकृत्याच्या प्रमाणात प्रतिफळ देत नाहीत. कारण पृथ्वीच्यावर आकाश जितके उंच आहे, तितकी त्यांची प्रीती, त्यांचे भय बाळगणार्यांवर विपुल आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 103:10-11
8
स्तोत्रसंहिता 103:19
याहवेहने स्वर्गात आपले सिंहासन प्रस्थापित केले आहे, आणि संपूर्ण विश्वावर त्यांची सत्ता आहे.
एक्सप्लोर करा स्तोत्रसंहिता 103:19
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ