1
प्रकटीकरण 3:20
मराठी समकालीन आवृत्ती
पाहा! मी दाराशी उभा राहून, दार ठोठावीत आहे. कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील, तर मी आत येईन; मी त्याच्याबरोबर जेवीन आणि तो माझ्याबरोबर जेवील.
तुलना करा
एक्सप्लोर करा प्रकटीकरण 3:20
2
प्रकटीकरण 3:15-16
तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत. तू थंड नाहीस व उष्ण नाहीस. तू थंड किंवा उष्ण असतास तर बरे झाले असते! पण तुम्ही कोमट आहात, म्हणजे उष्णही नाही आणि शीतही नाही; म्हणून मी तुम्हाला माझ्या मुखातून बाहेर ओकून टाकीन.
एक्सप्लोर करा प्रकटीकरण 3:15-16
3
प्रकटीकरण 3:19
ज्यांच्यावर मी प्रीती करतो, त्यांना मी दटावतो व शिक्षा देऊन शिस्त लावतो. म्हणून आस्थावान होऊन पश्चात्ताप करावा.
एक्सप्लोर करा प्रकटीकरण 3:19
4
प्रकटीकरण 3:8
तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत. पाहा, मी तुझ्यापुढे दार उघडून ठेवले आहे, ते कोणी बंद करू शकत नाही. मला माहीत आहे की तुला कमी शक्ती आहे, तरी तू माझे वचन पाळले व माझे नाव नाकारले नाही.
एक्सप्लोर करा प्रकटीकरण 3:8
5
प्रकटीकरण 3:21
मी विजयी होऊन माझ्या पित्याबरोबर त्यांच्या राजासनावर बसलो, तसेच विजय मिळविणार्या प्रत्येकाला मी माझ्या राजासनावर, माझ्याबरोबर बसण्यास अधिकार देईन.
एक्सप्लोर करा प्रकटीकरण 3:21
6
प्रकटीकरण 3:17
तुम्ही म्हणता, ‘मी श्रीमंत आहे; हवे ते धन मिळविले आहे; मला कसली उणीव नाही’ पण तुम्ही कष्टी, दीन, दरिद्री, आंधळे व उघडे आहात, हे तुम्हाला समजत नाही.
एक्सप्लोर करा प्रकटीकरण 3:17
7
प्रकटीकरण 3:10
धीर धरण्याविषयीच्या माझ्या आज्ञा तू पाळल्या आहेत, म्हणून पृथ्वीवर राहणार्या लोकांची परीक्षा होण्याचा जो प्रसंग सर्व जगावर येणार आहे, त्यापासूनही मी तुला राखीन.
एक्सप्लोर करा प्रकटीकरण 3:10
8
प्रकटीकरण 3:11
मी लवकर येत आहे. तुझा मुकुट कोणी घेऊ नये म्हणून जे तुझ्याजवळ आहे, ते दृढ धरून ठेव.
एक्सप्लोर करा प्रकटीकरण 3:11
9
प्रकटीकरण 3:2
जागृत हो! जे मरणाच्या पंथास लागले आहे ते सावरून धर, कारण तुझी कृत्ये माझ्या परमेश्वराच्या दृष्टीने मला परिपूर्ण अशी आढळली नाहीत.
एक्सप्लोर करा प्रकटीकरण 3:2
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ