YouVersion लोगो
सर्च आयकॉन

ईयोब 8

8
बिल्दद देवाच्या न्याय्यत्वाचा पुरस्कार करतो
1मग बिल्दद शूही म्हणाला,
2“तू असल्या गोष्टी कोठवर बोलत राहशील? सोसाट्याच्या वार्‍यासारखे तुझे तोंड कोठवर चालणार?
3देव निर्णय विपरीत करील काय? जो सर्वसमर्थ तो न्याय विपरीत करील काय?
4तुझ्या मुलांनी त्याच्याविरुद्ध पाप केले, म्हणून त्याने त्यांना त्यांच्या अपराधांचे फळ भोगायला लावले आहे.
5जर तू देवाचा धावा केला, सर्वसमर्थाची करुणा भाकली,
6तू शुद्ध व सरळ असलास, तर खातरीने तो तुझ्या हितास जागेल, तुला तुझ्या हक्काच्या जागी पुनःस्थापित करील.
7तुझा आरंभ अल्प असला तरी तुझा शेवट समृद्धीचा होईल.
8मागल्या पिढीच्या लोकांना विचार, त्यांच्या वडिलांनी जो शोध लावला त्याकडे लक्ष दे.
9(आपण तर कालचे, आपल्याला काही अनुभव नाही, कारण पृथ्वीवरचे आपले दिवस छायारूप आहेत;)
10ते तुला शिकवणार व सांगणार नाहीत काय? ते आपले हृद्‍गत तुला कळवणार नाहीत काय?
11लव्हाळा चिखलावाचून वाढतो काय? लव्हाळा पाण्यावाचून उगवतो काय?
12तो हिरवागार असून कापलाही नाही, तरी तो इतर सर्व प्रकारच्या हिरवळीच्या अगोदर सुकून जातो.
13देवाला विसरून जाणार्‍यांची गती अशीच आहे; भक्तिहीनाची आशा मावळते;
14त्याच्या आशेचा भंग होतो; ज्यावर त्याची भिस्त असते ते कोळ्याच्या जाळ्यासारखे ठरते.
15तो आपल्या घरावर टेकला असता ते टिकायचे नाही; त्याने ते घट्ट धरले असता ते स्थिर राहायचे नाही.
16तो सूर्यप्रकाशात टवटवीत होतो. त्याच्या फांद्या बागभर पसरतात.
17त्याची मुळे दगडांच्या राशींना वेष्टतात. तो खडकाळ जमिनीत शिरतो.
18त्याला त्या जागेतून उपटून नष्ट केले तर ती जागा त्याची ओळख टाकून म्हणेल, ‘मी तुला कधी पाहिले नाही.’
19पाहा, त्याच्या जीविताचा हाच काय तो आनंद! त्याच्यामागे असेच दुसरे जमिनीतून उगवतील.
20पाहा, देव सात्त्विक मनुष्याचा अव्हेर करीत नाही. तो कुकर्म्याला हाती धरत नाही.
21तुला तर तो हसतमुख करील, तुझ्या तोंडून जयजयकार करवील.
22तुझे वैरी लज्जेने व्याप्त होतील; दुष्टांची राहुटी नाहीशी होईल.”

सध्या निवडलेले:

ईयोब 8: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन