स्तोत्रसंहिता 4
4
सायंकाळची देवावरील श्रद्धासूचक प्रार्थना
मुख्य गवयासाठी; तंतुवाद्यांच्या साथीने गायचे दाविदाचे स्तोत्र.
1हे माझ्या न्यायदात्या देवा, मी तुझा धावा करतो तेव्हा माझे ऐक; मला तू पेचांतून मोकळे केले आहेस; माझ्यावर कृपा कर, माझी प्रार्थना ऐक.
2अहो मनुष्यांनो, माझ्या गौरवाची अप्रतिष्ठा कोठवर चालणार? तुम्हांला निरर्थक गोष्टी कोठवर आवडणार आणि तुम्ही लबाडीची कास कोठवर धरणार?
(सेला)
3तरी हे ध्यानात ठेवा की, परमेश्वराने त्याच्या स्वतःसाठी भक्तिमान मनुष्य निवडून काढला आहे; मी परमेश्वराचा धावा करीन तेव्हा तो माझे ऐकेल.
4त्याची भीती बाळगा, पाप करू नका; अंथरुणात पडल्यापडल्या आपल्या मनाशी विचार करा; स्तब्ध राहा.
(सेला)
5नीतिमत्त्वपूर्वक यज्ञ करा; परमेश्वरावर भाव ठेवा;
6“आमचे कल्याण कोण करील?” असे म्हणणारे पुष्कळ आहेत; हे परमेश्वरा, तू आपले मुखतेज आमच्यावर पाड.
7धान्याची व द्राक्षारसाची समृद्धी झाली म्हणजे लोकांना जो आनंद होतो त्यापेक्षा अधिक आनंद तू माझ्या मनात उत्पन्न केला आहेस.
8मी स्वस्थपणे पडून लगेच झोपी जातो, कारण हे परमेश्वरा, तूच मला एकान्तात निर्भय ठेवतोस.
सध्या निवडलेले:
स्तोत्रसंहिता 4: MARVBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi R.V. (Re-edited) Bible, पवित्र शास्त्र
Copyright © 2015 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.