YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्र. 3

3
प्राप्तःकाळची देवावरील श्रद्धासूचक प्रार्थना
दावीदाचे स्तोत्र; जेव्हा तो आपला मुलगा अबशालोम याच्यापुढून पळाला.
1परमेश्वरा, माझे शत्रू पुष्कळ आहेत!
पुष्कळ वळले आणि माझ्यावर हल्ला केला आहे.
2“परमेश्वराकडून त्यास काहीएक मदत होणार नाही,”
असे माझ्याविरूद्ध बोलणारे पुष्कळ आहेत. सेला #अल्पविराम
3परंतु हे परमेश्वरा, तू माझ्या सभोवती ढाल असा आहेस,
तू माझे वैभव, आणि माझे डोके वर करणारा आहे.
4मी माझा आवाज परमेश्वराकडे उंच करीन,
आणि तो मला त्याच्या पवित्र डोंगरावरून उत्तर देईल. सेला
5मी अंग टाकून झोपी गेलो;
मी जागा झालो, कारण परमेश्वर माझे रक्षण करतो.
6जे सर्वबाजूंनी माझ्यासाठी टपून बसले आहेत,
त्या लोकसमुदायला मी घाबरणार नाही.
7हे परमेश्वरा उठ, माझ्या देवा, मला तार!
कारण तू माझ्या सर्व शत्रूंच्या थोबाडीत मारली आहेस,
तू दुष्टांचे दात पाडले आहेत.
8तारण #विजयपरमेश्वरापासूनच आहे,
तुझ्या लोकांवर तुझा आशीर्वाद असो. सेला.

सध्या निवडलेले:

स्तोत्र. 3: IRVMar

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन