स्तोत्र. 37
37
दुष्ट व देवभक्त ह्यांचे भवितव्य
दाविदाचे स्तोत्र.
1दुष्टकृत्ये करणाऱ्यांवर चिडू नकोस,
जे अनीतीने वागतात त्यांचा हेवा करू नकोस.
2कारण ते लवकरच गवतासारखे वाळून जातील;
व हिरव्या वनस्पतीसारखे सुकून जातील.
3परमेश्वरावर विश्वास ठेव आणि जे चांगले आहे ते कर;
देशात स्थिर हो आणि विश्वासूपणाने आपला व्यवसाय कर.
4परमेश्वरामध्ये आनंद कर,
आणि तो तुला तुझ्या हृदयाच्या इच्छेप्रमाणे देईल.
5तू आपला मार्ग परमेश्वरावर सोपवून दे,
त्याच्यावर विश्वास ठेव आणि तो तुझ्याकडून कृती करील.
6तो तुझे न्यायीपण प्रकाशासारखे
आणि तुझा निष्पापपणा मध्यान्हाप्रमाणे दाखवील.
7परमेश्वरासमोर स्तब्ध राहा आणि धीराने त्याची वाट पाहा.
जर मनुष्य दुष्ट योजना आखतो, कोणी आपले वाईट मार्ग सिद्धीस नेतो,
तर काळजी करू नको.
8रागावू नकोस, संताप करून घेऊ नकोस.
त्याने फक्त त्रास होतो.
9कारण दुष्टकृत्ये करणारे नाश पावतील,
परंतु जे परमेश्वराची वाट पाहतात त्यांना देशाचे वतन मिळेल.
10थोड्याच काळात दुष्ट नाहीसे होतील;
तू त्यांच्या ठिकाणाकडे बघशील, परंतु ते सापडणार नाहीस.
11परंतु नम्र पृथ्वीचे वतन मिळवतील,
आणि मोठ्या समृद्धित ते हर्ष करतील.
12दुष्ट मनुष्य नितीमानाच्या विरोधात योजना आखतो,
आणि त्याच्याविरुध्द आपले दातओठ खातो.
13प्रभू त्यास हसत आहे,
कारण त्याचा दिवस येत आहे, हे तो पाहत आहे.
14जे पीडलेले आणि गरजवंत आणि जे सरळ आहेत,
त्यांना ठार मारण्यास दुष्टांनी आपली तलवार उपसली आहे आणि आपले धनुष्य वाकविले आहेत.
15परंतु त्यांचे धनुष्य मोडले जातील व त्यांच्या तलवारी त्यांच्याच हृदयास छेदतील.
16अनेक दुष्ट लोकांच्या विपुलतेपेक्षा,
नितीमानाकडे जे थोडे ते उत्तम आहे.
17कारण दुष्ट लोकांचे बाहू मोडले जातील
परंतु परमेश्वर नितीमानांना आधार देईल.
18परमेश्वर निर्दोषास दिवसेन दिवस बघतो,
आणि त्यांचे वतन सदैव राहील.
19वाईट समयी ते लज्जीत होणार नाहीत.
जेव्हा दुष्काळ येईल तेव्हा त्यांच्याकडे खाण्यास पुरेसे असेल.
20परंतु दुष्ट मनुष्य नाश पावतील,
परमेश्वराचे शत्रू कुरणाच्या शोभेसारखे होतील;
ते नाश होतील आणि धुरामध्ये नाहीसे होतील.
21दुष्ट पैसे उसने घेतो परंतु त्याची परत फेड करत नाही.
परंतु नितीमान मनुष्य उदारतेने देतो.
22जे देवाकडून आशीर्वादित झालेले आहेत, ते भूमीचे वतन पावतील;
आणि जे त्याच्याकडून शापित आहेत, ते छेदून टाकले जातील.
23मनुष्याची पावले परमेश्वराकडून स्थिर केली जातात,
असा मनुष्य ज्याचे मार्ग देवाच्या दृष्टीने प्रशंसनीय असतात.
24जरी तो अडखळला, तरी तो खाली पडणार नाही.
कारण परमेश्वर त्यास आपल्या हाताने सावरील.
25मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालो आहे;
तरी नितीमान टाकलेला किंवा त्याच्या मुलांस भाकरी मागताना मी पाहिले नाही.
26सारा दिवस तो दयाळूपणाने वागतो आणि उसने देतो,
त्याची संतती आशीर्वादित असते.
27वाईटापासून फिर आणि चांगले ते कर.
तेव्हा तू सर्वकाळासाठी वाचवला जाशील.
28कारण परमेश्वरास न्याय प्रिय आहे
आणि तो विश्वासाने त्याच्यामागे चालणाऱ्यांस सोडत नाही.
ते सर्वकाळासाठी राखून ठेवलेले आहेत.
परंतु दुष्टाचे वंशज छेदले जातील.
29नितीमान तर पृथ्वीचे वतन पावतील
आणि सर्वकाळ त्यामध्ये वस्ती करतील.
30नितीमान मनुष्याचे मुख ज्ञान बोलते,
आणि न्याय वाढवते.
31त्याच्या हृदयात त्याच्या देवाचे नियमशास्त्र असते,
त्याचे पाय कधी घसरणार नाहीत.
32परंतु दुष्ट मनुष्य हा नितीमान मनुष्यास बघतो,
आणि त्यास मारण्याच्या शोधात असतो.
33परंतु परमेश्वर त्यांना दुष्ट मनुष्याच्या हातात त्यागणार नाही.
किंवा जेव्हा त्याचा न्याय होईल तेव्हा त्यास अपराधी ठरवणार नाही.
34परमेश्वराची वाट पाहा आणि त्याचे मार्ग पाळ.
आणि तो तुला वर उचलणार म्हणजे तुला भूमी मिळेल.
जेव्हा दुष्ट छेदला जाणार तेव्हा तू पाहशील.
35मी विस्तारलेल्या आणि सशक्त झाडासारखा एक दुष्ट मनुष्य पाहिला.
जो आपले मूळ जमिनीत पसरवतो.
36परंतु जेव्हा मी त्याच्यापासून पुन्हा गेलो, तर तो तेथे नव्हता.
मी त्यास शोधले पण तो मला सापडला नाही.
37प्रमाणिक माणसाकडे लक्ष लाव आणि सरळास निशाणी लाव.
कारण शांततेत राहण्याऱ्या मनुष्याचे भविष्य चांगले असते.
38पापी तर पूर्णपणे नाश पावतील,
परंतू दुष्टाचा भावीकाळ छेदून टाकला जाईल.
39नितीमानाचे तारण हे परमेश्वराकडून येते,
संकटसमयी तो त्यांचे रक्षण करीन.
40परमेश्वर त्यांना मदत करील आणि त्यांना तारील,
तो त्यांचा वाईट लोकांपासून बचाव करतो,
कारण त्यांनी परमेश्वराच्याठायी आश्रय घेतला आहे.
सध्या निवडलेले:
स्तोत्र. 37: IRVMar
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.