YouVersion लोगो
सर्च आयकॉन

1 थेस्सल 5

5
प्रभूचे आगमन व जागृतीची आवश्यकता
1बंधूंनो, ह्या गोष्टी घडण्याचा काळ व नियोजित समय ह्यांविषयी तुम्हांला काही लिहिण्याची गरज नाही; 2कारण तुम्हांला स्वतःला पक्के माहीत आहे की, जसा रात्री चोर येतो, तसा प्रभूचा दिवस येईल. 3शांती व सुरक्षितता आहे, असे ते म्हणतात, तेव्हा अकस्मात नाश ओढवेल! गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे अकस्मात प्रसूती वेदना होतात, त्याप्रमाणे त्यांचा नाश होईल; त्यांचा निभाव लागणार नाही. 4परंतु बंधुंजनहो, त्या दिवसाने तुम्हांला चोरासारखे गाठावे, असे तुम्ही अंधारात नाही. 5तुम्ही सगळे प्रकाशाची आणि दिवसाची मुले आहात. आपण रात्रीचे किंवा अंधाराचे नाही. 6म्हणून आपण इतरांसारखी झोप घेऊ नये, तर जागे राहून सावध असावे. 7झोप घेणारे रात्री झोप घेतात आणि झिंगणारे रात्रीचे झिंगतात 8परंतु आपण दिवसाचे आहोत म्हणून आपण सावध असावे. आपण विश्वास व प्रीती हे उरस्त्राण व तारणाची आशा हे शिरस्त्राण घालावे. 9आपल्यावर क्रोध व्हावा म्हणून नव्हे, तर आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे आपले तारण व्हावे म्हणून देवाने आपल्याला नेमलेले आहे. 10प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला, ह्यासाठी की, आपण जागे असलो किंवा झोपलेले असलो, तरी आपण त्याच्याबरोबर जिवंत असावे. 11म्हणून ज्याप्रमाणे आता तुम्ही करीत आहात, त्याप्रमाणे तुम्ही एकमेकांना प्रोत्साहन द्या व एकमेकांची उभारणी करा.
सद्बोध व समारोप
12बंधुंजनहो, आम्ही तुम्हांला विनंती करतो की, तुमच्यामध्ये जे श्रम करतात, प्रभूवरील श्रद्धेपोटी तुमच्यावर अधिकार चालवितात व तुम्हांला बोध करतात त्यांचा तुम्ही सन्मान करावा; 13त्यांच्या कामामुळे त्यांना प्रीतीने सर्वोच्च मान द्यावा. तुम्ही आपसात शांतीने राहा.
14बंधूंनो, आम्ही तुम्हांला आवाहन करतो की, आळशी लोकांना ताकीद द्या, जे अल्प धीराचे आहेत त्यांना धीर द्या. दुर्बलांना आधार द्या, सर्वांबरोबर सहनशीलतेने वागा. 15कोणी कोणाचे वाइटाबद्दल वाईट करू नये म्हणून जपून राहा; सर्वदा एकमेकांचे व सर्वांचे चांगले करीत राहा.
16सर्वदा आनंद करा. 17निरंतर प्रार्थना करा. 18सर्व परिस्थितीत कृतज्ञ राहा; कारण तुमच्याविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे.
19पवित्र आत्म्याला विझवू नका. 20संदेष्ट्यांच्या शद्बांचा तिरस्कार करू नका. 21सर्व गोष्टींची पारख करा. चांगले ते घट्ट धरून ठेवा. 22वाइटाच्या प्रत्येक प्रकारापासून दूर राहा.
23शांतिदाता देव स्वतः तुम्हांला परिपूर्णपणे पवित्र करो आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या आगमनसमयी तुमचा आत्मा, जीव व शरीर ही संपूर्णपणे निर्दोष राखो. 24तुम्हांला पाचारण करणारा विश्वसनीय आहे, तो हे करील.
25बंधूंनो, आमच्यासाठी प्रार्थना करा.
26पवित्र चुंबनाने सर्व श्रद्धावंतांना शुभेच्छा द्या.
27मी तुम्हांला प्रभूच्या अधिकाराने निक्षून सांगतो की, हे पत्र सर्व बंधूंना वाचून दाखविण्यात यावे.
28आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याची कृपा तुमच्याबरोबर राहो.

सध्या निवडलेले:

1 थेस्सल 5: MACLBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन