तीत प्रस्तावना
प्रस्तावना
तीत एक यहुदीतर नागरिक होता. यहुदी समाजाबाहेरचा हा माणूस धर्मांतर करून ख्रिस्ती झाला व प्रेषित पौलाचा सहकारी म्हणून सेवाकार्य करू लागला. क्रेत येथे असलेल्या ख्रिस्तमंडळीवर त्याला प्रमुख नेमले होते.
पौलाने तीतला लिहिलेल्या प्रस्तुत बोधपत्रात तीन मुद्यांचा उल्लेख केलेला आहे: क्रेतमधील बऱ्याच लोकांच्या गैरवर्तणुकीच्या संदर्भात ख्रिस्ती नेतृत्व करण्यासाठी व शील जोपासण्याची आवश्यकता विशद करण्यात आली आहे. पुढे सर्व वयोगटांतील ख्रिस्ती लोकांना त्यांच्या गरजांनुसार कसे प्रबोधन करायला हवे, याविषयी तीतला मार्गदर्शन करण्यात आले आहे. शेवटी, ख्रिस्ती नेत्याने ऐक्यासाठी व शांतीसाठी सर्वांबरोबर मैत्रीपूर्ण संबंध ठेवावेत, असा बोध करण्यात आला आहे.
रूपरेषा
विषयप्रवेश 1:1-4
वडीलजनांविषयी 1:5-16
निरनिराळ्या गटांच्या जबाबदाऱ्या 2:1-15
बोध आणि इशारे 3:1-11
समारोप 3:12-15
सध्या निवडलेले:
तीत प्रस्तावना: MACLBSI
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
Marathi C.L. (NT), पवित्र शास्त्र
Copyright © 2018 by The Bible Society of India
Used by permission. All rights reserved worldwide.