YouVersion लोगो
सर्च आयकॉन

आमोस 4

4
इस्राएल परमेश्वराकडे परतले नाही
1शोमरोनच्या डोंगरावर राहणार्‍या बाशानच्या गाईंनो हे वचन ऐका,
तुम्ही स्त्रिया, ज्या तुम्ही गरिबांवर अत्याचार करता आणि गरजवंतांना चिरडता
आणि आपल्या नवर्‍यांना म्हणता, “आम्हाला काही पेय आणा!”
2सार्वभौम याहवेहने आपल्या पवित्रतेची शपथ घेऊन म्हटले आहे:
“खचितच अशी वेळ येईल
जेव्हा तुम्हाला आकड्यांनी आणि तुमच्यातील शिल्लक राहिलेल्यांना
मासे धरण्याच्या गळांनी#4:2 किंवा माशांच्या टोपलीत ओढून नेतील.
3तुमच्यातील प्रत्येक
भिंतीच्या भगदाडातून सरळ निघून जाल.
तुम्ही हर्मोनात#4:3 काही मूळ प्रतींमध्ये तू अत्याचार करणार्‍या पर्वता आपणाला टाकाल.”
असे याहवेह म्हणतात.
4“बेथेलास जा आणि पाप करा;
गिलगालास जाऊन आणि अधिक पाप करा.
रोज सकाळी आपली अर्पणे,
दर तीन वर्षांनी#4:4 किंवा दिवसांनी आपला दशांश आणा.
5उपकारस्तुती म्हणून खमिराची भाकरी जाळून टाका
आणि तुमच्या स्वैच्छिक अर्पणांची फुशारकी मारा;
इस्राएली लोकहो तुम्ही याविषयी बढाई मिरवा,
कारण असेच करणे तुम्हाला आवडते.”
असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.
6“मी तुम्हाला प्रत्येक शहरात उपाशी पोटी ठेवले
आणि प्रत्येक नगरात भाकरीची कमतरता केली,
तरीही तुम्ही मजकडे वळला नाही.”
असे याहवेह जाहीर करतात.
7“हंगामाच्या आधी तीन महिने
मी पाऊस रोखून धरला.
मी एका नगरावर पाऊस पाडला,
पण दुसर्‍यावर पाडला नाही.
एका शेतावर पाऊस पडला;
दुसर्‍या शेतावर पाऊस नव्हता आणि ते सुकून गेले.
8पाण्यासाठी लोक नगरोनगरी भटकले
परंतु त्यांना पिण्यास पुरेसे मिळाले नाही,
तरीही तुम्ही मजकडे वळला नाही.”
असे याहवेह जाहीर करतात.
9“मी तुमच्या शेतांवर व द्राक्षमळ्यांवर तांबेरा
आणि भेरड हे रोग पाठविले;
टोळांनी तुमची अंजिराची व जैतुनाची झाडे खाऊन टाकली,
आणि तरीही तुम्ही माझ्याकडे वळला नाही,”
असे याहवेह जाहीर करतात.
10“इजिप्तमध्ये पाठविल्या
तशा पीडा मी तुमच्यामध्ये पाठविल्या.
मी तुमच्या तरुणांना
तुमच्या लुटलेल्या घोड्यांसहित तलवारीने मारून टाकले.
तुमच्या छावणीतील दुर्गंध तुमच्या नाकात भरला,
तरीही तुम्ही माझ्याकडे वळला नाही,”
असे याहवेह जाहीर करतात.
11“तुमच्यातील काहींचा नाश असा केला
जसा मी, परमेश्वराने, सदोम आणि गमोराचा केला.
तुम्ही अग्नीच्या भट्टीतून ओढून काढलेल्या जळत्या काठीप्रमाणे होता,
तरीही तुम्ही माझ्याकडे वळला नाही,”
असे याहवेह जाहीर करतात.
12“म्हणून हे इस्राएला, मी तझ्यासोबत असेच करणार आहे,
कारण मी तुझ्याशी असे करणार आहे,
म्हणून तुझ्या परमेश्वराला भेटण्यास तयार हो.”
13ज्यांनी पर्वतांची रचना केली,
ज्यांनी वारे निर्माण केले,
आणि जे आपले विचार मानवजातीला प्रकट करतात,
जे प्रभात समयाला अंधकारात बदलतात
आणि पर्वताला आपल्या पायाखाली तुडवितात;
याहवेह सर्वसमर्थ परमेश्वर, हे त्यांचे नाव आहे.

सध्या निवडलेले:

आमोस 4: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन