YouVersion लोगो
सर्च आयकॉन

उपदेशक 4

4
जुलूम, कष्ट, मैत्रीहीनता
1मी पुन्हा पाहिले आणि मला सूर्याखाली होत असलेला जुलूम दिसला:
पीडितांचे अश्रू मी पाहिले—
आणि त्यांचे सांत्वन करणारा असा कोणी नाही.
छळ करणार्‍यांच्या हाती अधिकार होते—
आणि त्यांचे सांत्वन करणारे कोणी नव्हते.
2यावरून मी घोषित केले,
मृत असलेल्या व्यक्ती,
जिवंत असलेल्या माणसांपेक्षा
अधिक संतुष्ट आहेत.
3परंतु त्या दोघांपेक्षाही जो
जन्मालाच आला नाही तो अधिक बरा.
सूर्याखाली असलेले जे वाईट
ते त्यांच्या पाहण्यात आले नाही.
4आणि मी हे पाहिले की, एखाद्याला दुसर्‍याविषयी असलेल्या मत्सराच्या भावनेतून कष्ट आणि सर्व यश संपादन करता येते. हे सुद्धा व्यर्थच आहे, वार्‍यामागे धावल्यासारखे आहे.
5मूर्ख तर हात बांधून बसतात
आणि स्वतःचा नाश करून घेतात.
6अधिक कष्ट करून वार्‍याच्या मागे धावून,
दोन्ही हात भरून घेण्यापेक्षा,
शांती समाधानाने एक हात भरून घेणे योग्य आहे.
7पुन्हा एकदा या सूर्याखाली निरर्थक असे काहीतरी मी पाहिले:
8एक एकटाच मनुष्य होता;
त्याला ना मुलगा होता ना भाऊ.
त्याच्या श्रमाला अंत नव्हता,
तरी त्याच्या डोळ्यात धनाने तृप्तता नव्हती.
तो विचारीत होता, “मी कोणासाठी हे श्रम करीत आहे,”
“आणि मी स्वतःला आनंदापासून का वंचित ठेवीत आहे?”
हे सुद्धा व्यर्थ आहे—
ही दैन्यावस्था आहे.
9एकापेक्षा दोघेजण बरे!
कारण त्यांच्या कष्टाचे अधिक चांगले प्रतिफळ मिळेल:
10दोघांपैकी एकजण पडला,
तर दुसरा त्याला मदत करून उठवेल,
परंतु एकजण पडला आणि त्याला उचलण्यास कोणी नसला
तर ते दयनीय आहे.
11जेव्हा दोन व्यक्ती झोपतील तेव्हा ते एकमेकांना ऊब देतील,
पण कोणी एकटा असल्यास, त्याला ऊब कशी मिळणार?
12एकट्या व्यक्तीवर मात करता येते,
दोघे स्वतःचा बचाव करू शकतात,
तीन पदरी दोर सहजपणे तुटत नाही.
प्रगती निरर्थक आहे
13मूर्ख आणि संभाव्य संकटाचा इशारा न समजणारा राजा असण्यापेक्षा, गरीब परंतु सुज्ञ तरुण असणे चांगले. 14तो तरुण तुरुंगातून राज्यपदावर आला असेल किंवा त्या राज्यात गरिबीत जन्मला असेल. 15मी हे पाहिले की या सूर्याखाली जे जिवंत आहेत ते त्या तरुणाचे अनुकरण करतात, जो राज्याचा उत्तराधिकारी आहेत. 16त्यांच्या पूर्वी असंख्य लोक होते. परंतु जे नंतर आले ते त्या उत्तराधिकाऱ्याशी संतुष्ट नव्हते. हे सर्वसुद्धा व्यर्थच, वार्‍याचा पाठलाग करण्यासारखे आहे.

सध्या निवडलेले:

उपदेशक 4: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन