शास्ते 10
10
तोला
1अबीमेलेखाच्या काळानंतर इस्साखार गोत्राताल एक पुरुष, तोला जो पुआहचा पुत्र व दोदोचा नातू इस्राएलाच्या सुटकेसाठी उभा राहिला. तो एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील शामीर नगरात राहत असे. 2तेवीस वर्षे त्याने इस्राएलचे नेतृत्व#10:2 किंवा न्याय केला केले; नंतर त्याचा मृत्यू झाला आणि त्याला शामीर येथे मूठमाती देण्यात आली.
याईर
3त्याच्यानंतर याईर गिलआदीचा उदय झाला. त्याने बावीस वर्षे इस्राएलचे नेतृत्व केले. 4त्याचे तीस पुत्र होते, जे तीस गाढवांवर स्वार होत असत. गिलआद येथील तीस नगरे त्यांच्या अधिकारात होती. ती आज देखील हव्वोथ-याईर#10:4 किंवा याईराची वस्ती म्हणून संबोधली जातात. 5याईर मरण पावल्यावर त्याला कामोन येथे मूठमाती देण्यात आली.
इफ्ताह
6इस्राएली लोकांनी याहवेहच्या दृष्टीने पुन्हा वाईट कृत्य केले. ते बआल व अष्टारोथ या दैवतांच्या मूर्तीची आणि अरामाचे दैवत, सीदोनाचे दैवत, मोआबाचे दैवत, अम्मोनाचे दैवत व पलिष्टीच्या दैवतांची उपासना व सेवा करू लागले. इस्राएली लोक याहवेहला विसरले आणि त्यांची सेवा करणे सोडले. 7यास्तव याहवेहचा राग इस्राएलवर भडकला. त्यांनी त्यांना पलिष्टी आणि अम्मोनी लोकांच्या हाती विकले. 8ज्यांनी त्या वर्षी त्यांची दाणादाण केली आणि त्यांना चिरडून टाकले. अठरा वर्षे त्यांनी अमोऱ्यांचा देश असलेल्या गिलआदामध्ये यार्देन नदीच्या पूर्वेकडील सर्व इस्राएली लोकांवर अत्याचार केला. 9तसेच यहूदाह घराणे, बिन्यामीन घराणे व एफ्राईम घराण्यांविरुद्ध युद्ध करण्यास अम्मोनी वंशजांनी यार्देन नदी पार केली; यामुळे इस्राएली फार संकटात होते. 10तेव्हा इस्राएली लोकांनी याहवेहला आरोळी मारली, “आम्ही आमच्या परमेश्वराचा त्याग केला आणि बआलची सेवा करून तुमच्याविरुद्ध पाप केले आहे.”
11याहवेहने इस्राएली लोकांना उत्तर दिले, “जेव्हा इजिप्ती, अमोरी, अम्मोनी, पलिष्टी, 12सीदोनी, अमालेकी व माओनी#10:12 काही इब्री मूळ प्रतींनुसार मिद्यानी या सर्वांनी तुमच्यावर अत्याचार केला आणि तुम्ही माझ्या मदतीसाठी धावा केला आणि मी तुम्हाला सोडविले नाही काय? 13परंतु तुम्ही माझा त्याग केला आणि इतर दैवतांची सेवा करू लागले, म्हणून यापुढे मी तुम्हाला सोडविणार नाही. 14जा आणि तुम्ही निवडलेल्या नवीन दैवतांचा धावा करा. तुमच्या आपत्काली त्यांनीच तुम्हाला सोडवावे!”
15परंतु इस्राएली लोकांनी याहवेहला म्हटले, “आम्ही पाप केले आहे. तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा, पण आता आम्हाला सोडवा.” 16नंतर त्यांनी त्यांच्याजवळ असलेली परदेशी दैवते दूर टाकली आणि याहवेहची सेवा केली. याहवेहना इस्राएलची दैन्यावस्था सहन झाली नाही.
17जेव्हा अम्मोनी लोकांना युद्धासाठी एकत्र करण्यात आले आणि त्यांनी गिलआदामध्ये तळ ठोकला, तेव्हा इस्राएली लोक एकत्र आले आणि त्यांनी मिस्पाह येथे तळ दिला. 18गिलआदाच्या लोकांचे पुढारी एकमेकांना म्हणाले, “जो कोणी अम्मोनी लोकांवर हल्ला करण्यास पुढाकार घेईल तो गिलआदामध्ये राहणार्या सर्वांचा प्रमुख होईल.”
सध्या निवडलेले:
शास्ते 10: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.