YouVersion लोगो
सर्च आयकॉन

लेवीय 2

2
धान्यार्पण
1“ ‘जेव्हा कोणी याहवेहला धान्यार्पण आणत असेल, तर त्यांची अर्पणे उत्तम पिठाची असावीत. त्यांनी त्यावर जैतुनाचे तेल ओतावे व त्यावर धूप ठेवावा. 2आणि अहरोनाचे पुत्र जे याजक आहेत त्यांच्याकडे ते आणावे. याजक मूठभर पीठ आणि तेल घेतील, त्याचबरोबर सर्व धूप स्मरणाचा भाग म्हणून वेदीवर एकत्र जाळतील, हे अन्नार्पण, हा याहवेहला प्रसन्न करणारा सुगंध आहे. 3अन्नार्पणातून राहिलेले धान्य अहरोन आणि त्याच्या पुत्रांचे असावे; याहवेहला दिलेल्या अन्नार्पणाचा हा परमपवित्र भाग आहे.
4“ ‘जर तुम्ही भट्टीत भाजलेले अन्नार्पण आणता, तर ते उत्तम पिठाचे असावे: बेखमीर जाड भाकरी आणि जैतुनाच्या तेलात मळलेल्या किंवा पातळ बेखमीर भाकरी आणि वर जैतुनाचे तेल लावलेले असे असावे. 5जर तुमचे अन्नार्पण तव्यावर भाजलेले असेल तर ते उत्तम पिठापासून तयार केलेले तेलात मिसळलेले आणि बेखमीर असे असावे. 6तिचा भुगा करावा आणि त्यावर तेल ओतावे; हे धान्यार्पण आहे. 7जर तुमचे धान्यार्पण भांड्यात शिजविलेले असेल, तर ते उत्तम पिठाचे आणि थोडेसे जैतुनाचे तेल वापरून तयार केलेले असावे. 8याहवेहला अर्पण करण्याचे अशा प्रकारच्या वस्तूंनी बनविलेले धान्यार्पण तुम्ही याजकास आणून द्यावे व त्याने ते वेदीवर ठेवावे. 9स्मरणभाग म्हणून याजक ते अन्नार्पणातून काढून ठेवेल आणि याहवेहला प्रसन्न करणारे सुवासिक अन्नार्पण म्हणून वेदीवर त्याचे हवन करेल. 10अन्नार्पणातून राहिलेले धान्य अहरोन आणि त्याच्या पुत्रांचे असावे; याहवेहला दिलेल्या अन्नार्पणाचा हा परमपवित्र भाग आहे.
11“ ‘याहवेहसाठी आणले जाणारे प्रत्येक अन्नार्पण हे खमीर न घालता तयार करावे, तुम्ही याहवेहसाठी आणलेल्या अन्नार्पणात खमीर किंवा मध जाळू नये. 12तुम्ही त्यांना प्रथमफळाचे अर्पण म्हणून याहवेहकडे आणू शकता, परंतु ते वेदीवर प्रसन्न करणारे सुवासिक अर्पण म्हणून करू नये. 13प्रत्येक अर्पण मीठ घालून रुचकर करावे, कारण तुमच्या परमेश्वराबरोबर झालेल्या कराराचे मीठ तुमच्या अन्नार्पणात असलेच पाहिजे.
14“ ‘जर तुम्ही याहवेहसाठी प्रथम पिकाचे धान्यार्पण आणले, तर नवीन कणसाला चिरडून भाजलेल्या दाण्याचे अर्पण करावे. 15त्यावर जैतुनाचे तेल व धूप ठेवावे; ते धान्यार्पण आहे. 16याजकाने त्या चिरडलेल्या धान्याचा आणि तेलाचा स्मरणभाग, सर्व धूपांबरोबर एकत्र जाळावा, याहवेहसाठी अर्पण असे हे एक अन्नार्पण असावे.

सध्या निवडलेले:

लेवीय 2: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन