YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 127

127
स्तोत्र 127
प्रवाशांचे एक आराधना गीत. शलोमोनाची रचना.
1याहवेहने घर बांधले नाही,
तर बांधकाम करणार्‍यांचे श्रम व्यर्थ आहेत;
याहवेहने शहराचे रक्षण केले नाही,
तर पहारेकर्‍यांचे जागणे व्यर्थ आहे.
2तुमचे पहाटे उठणे
आणि रात्री उशीरापर्यंत
अन्नप्राप्तीसाठी कष्ट करणे व्यर्थ आहे—
कारण आपल्या प्रियजनांस याहवेहच शांत झोप देतात.
3मुले, ही याहवेहकडून मिळालेला वारसा आहे,
प्रसवशील कूस, हे याहवेहकडून लाभणारे प्रतिफळ आहे.
4तरुणपणी झालेली मुले,
शूरवीराच्या हातातील बाणांप्रमाणे आहेत.
5ज्या पुरुषाचा भाता
अशा बाणांनी भरलेला आहे, तो धन्य!
असे पुरुष वेशीत आपल्या शत्रूशी न्यायालयात वाटाघाटी करतील,
तेव्हा ते लज्जित होणार नाहीत.

सध्या निवडलेले:

स्तोत्रसंहिता 127: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन