स्तोत्रसंहिता 141
141
स्तोत्र 141
दावीदाचे एक स्तोत्र.
1हे याहवेह, मी तुमचा धावा करतो, त्वरा करा व मजकडे या,
जेव्हा तुमचा धावा करतो, तेव्हा माझे ऐका.
2तुम्हाला माझी प्रार्थना सुगंधी धुपाप्रमाणे प्रसन्न करो;
माझे हात उभारणे सायंकाळच्या यज्ञाप्रमाणे होवो.
3हे याहवेह, माझ्या मुखावर पहारा ठेवा;
माझ्या ओठांच्या द्वारावर नजर ठेवा.
4माझ्या हृदयास अनीतीकडे ओढले जाऊ देऊ नका,
पातक्यांच्या सहवासात राहून,
कुकृत्यामध्ये सामील होण्यापासून मला दूर ठेवा;
त्यांची मिष्टान्ने खाण्यापासून मला अलिप्त ठेवा.
5नीतिमान मला शासन करो—ते माझ्यासाठी कृपाच ठरेल;
त्यांनी केलेली कान उघाडणी—मला तैलाभ्यंगासारखी वाटते.
माझे मस्तक ते कधीही नाकारणार नाही,
दुष्ट माणसांच्या दुराचाराविरुद्ध मी सतत प्रार्थना करेन.
6दुर्जनांचे पुढारी दोषी ठरून, त्यांना कडेलोटाचे शासन होईल;
तेव्हा त्यांच्या हितासाठी असलेल्या माझ्या वक्तव्याचे त्यांना स्मरण होईल.
7ते म्हणतील, “नांगर चालविल्यानंतर जसे मातीची ढेकळे मोडून विखुरतात,
तशी आमची हाडे अधोलोकाच्या मुखावर विखुरली गेली आहेत.”
8परंतु सार्वभौम याहवेह, मी तुमच्यावरच दृष्टी केंद्रित केली आहे;
तुम्हीच माझा आश्रय आहात—मला मृत्यूच्या हवाली करू नका.
9दुष्टांच्या फासातून माझा बचाव करा,
त्यांनी टाकलेल्या पाशापासून मला सोडवा.
10दुर्जन त्यांच्याच जाळ्यांमध्ये अडकू दे,
आणि मी मात्र सुखरुपपणे निसटून जाईन.
सध्या निवडलेले:
स्तोत्रसंहिता 141: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.