YouVersion लोगो
सर्च आयकॉन

स्तोत्रसंहिता 148

148
स्तोत्र 148
1याहवेहचे स्तवन करा.
आकाशमंडलातून त्यांचे स्तवन करा;
ऊर्ध्वलोकी त्यांचे स्तवन करा.
2त्यांचे सर्व स्वर्गदूत, त्यांचे स्तवन करो;
त्यांची सर्व स्वर्गीय सेना, त्यांचे स्तवन करो.
3सूर्य आणि चंद्रमा त्यांचे स्तवन करा;
सर्व चमकत्या तारकांनो, त्यांचे स्तवन करा.
4हे सर्वोच्च आकाशांनो,
आणि आकाशाच्याही वरील जलांनो, त्यांचे स्तवन करा.
5त्यांची निर्मिती याहवेहचे स्तवन करो,
कारण त्यांनी आज्ञा दिली आणि ती अस्तित्वात आली.
6आणि त्यांनी त्यांची स्थापना सदासर्वकाळासाठी केली आहे—
त्यांची राजाज्ञा कधीही रद्द केली जाणार नाही.
7पृथ्वीवर याहवेहचेच स्तवन होवो,
खोल महासागर व त्यातील समस्त विशालकाय प्राण्यांनो,
8विजा व गारा, हिम व धुके,
तसेच वादळी वारे, त्यांचे स्तवन करोत.
9अहो पर्वतांनो व सर्व टेकड्यांनो,
फळझाडे व समस्त गंधसरू,
10हिंस्र पशू आणि सर्व गुरे,
सूक्ष्म जीव व उडणारे पक्षी,
11पृथ्वीवरील राजे व सर्व राष्ट्रे,
अहो अधिपती व त्यांच्या न्यायाधीशांनो,
12युवक व युवतींनो,
वृद्ध व बालके.
13तुम्ही सर्व याहवेहचे स्तवन करा,
कारण केवळ त्यांच्याच नामाला महिमा मिळो;
त्यांचे ऐश्वर्य पृथ्वी आणि आकाशाहून महान आहे.
14त्यांनी त्यांच्या लोकांचे शिंग उभारले आहे,
ते त्यांच्या सर्व नीतिमान भक्तांना, त्यांच्या अंतःकरणासमीप,
त्यांना अत्यंत प्रिय अशा इस्राएली लोकांना स्तवन पात्र केले आहे.
याहवेहचे स्तवन करा.

सध्या निवडलेले:

स्तोत्रसंहिता 148: MRCV

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन