स्तोत्रसंहिता 149
149
स्तोत्र 149
1याहवेहचे स्तवन करा.
याहवेहसाठी एक नवे गीत गा,
त्यांच्या भक्तांच्या सभेत त्यांची स्तुतिस्तोत्रे गायली जावोत.
2हे इस्राएला, आपल्या निर्माणकर्त्याच्या ठायी आनंदोत्सव कर;
अहो सीयोनकरांनो, आपल्या राजाच्या ठायी उल्लास पावा.
3त्यांच्या गौरवार्थ नृत्य करीत,
डफ आणि वीणा यांच्या संगीताच्या साथीवर स्तुती गा.
4कारण याहवेहला आपल्या लोकांमुळे संतोष होतो;
ते नम्रजनांस विजयी करतात.
5या सन्मानामुळे त्यांचे सात्विक उल्लास करोत
आणि आपल्या अंथरुणावर हर्षगीते गावोत.
6त्यांच्या मुखात परमेश्वराची आराधना असो
आणि दुधारी तलवार त्यांच्या हातात धारण करून,
7राष्ट्रांसाठी त्यांनी नेमलेल्या शिक्षा अंमलात आणण्यास
सिद्ध व्हावे;
8त्या राष्ट्रांच्या राजांना बेड्या घाला
आणि त्यांच्या पुढार्यांना लोखंडी साखळदंडानी बांधा.
9त्यांना दिलेल्या शिक्षांची अंमलबजावणी करा.
हाच याहवेहच्या विश्वासू लोकांचा गौरव आहे.
याहवेहचे स्तवन करा.
सध्या निवडलेले:
स्तोत्रसंहिता 149: MRCV
ठळक
सामायिक करा
कॉपी करा
तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन
पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती™
ग्रंथाची मालकी © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 Biblica, Inc.
यांची परवानगी घेऊन केले गेले आहे.
सर्व अधिकार जगभरात राखीव.
Holy Bible, Marathi Contemporary Version™
Copyright © 1978, 1982, 2008, 2021, 2022, 2024 by Biblica, Inc.
Used with permission.
All rights reserved worldwide.