1 पेत्र 4:11
1 पेत्र 4:11 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
जो भाषण करतो त्याने आपण देवाची वचने बोलत आहोत असे बोलावे व जो सेवा करतो त्याने आपण आपली सेवा देवाने दिलेल्या शक्तीने करीत आहोत अशी करावी. म्हणजे, येशू ख्रिस्ताद्वारे, सर्व गोष्टींत देवाचे गौरव करावे, त्यास गौरव व पराक्रम ही युगानुयुग असोत. आमेन.
1 पेत्र 4:11 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जर कोणी संदेश देतो तर त्याने असा संदेश द्यावा की, तो परमेश्वराचेच शब्द बोलत आहे. जर कोणी सेवा करतात, तर परमेश्वर जशी शक्ती पुरवितात त्याप्रमाणे करावी, म्हणजे सर्व गोष्टीमध्ये येशू ख्रिस्ताद्वारे परमेश्वराचे गौरव होईल. त्यांना गौरव आणि सामर्थ्य सदासर्वकाळ असो. आमेन!
1 पेत्र 4:11 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
भाषण करणार्याने, आपण देवाची वचने बोलत आहोत, असे बोलावे; सेवा करणार्याने, ती आपण देवाने दिलेल्या शक्तीने करत आहोत, अशी करावी; ह्यासाठी की, सर्व गोष्टींत देवाचा गौरव येशू ख्रिस्ताच्या द्वारे व्हावा; गौरव व पराक्रम हे युगानुयुग त्याचे आहेत. आमेन.
1 पेत्र 4:11 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
शुभवर्तमान सांगणाऱ्याने देवाचा संदेश सांगावा. सेवा करणाऱ्याने ती आपण देवाने दिलेल्या शक्तीने करीत आहोत या भावनेने करावी, ह्यासाठी की, सर्व गोष्टींत येशू ख्रिस्ताद्वारे देवाचा गौरव व्हावा. गौरव व पराक्रम ही युगानुयुगे त्याची आहेत. आमेन.