1 थेस्सल 5:23-24
1 थेस्सल 5:23-24 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि स्वतः शांतीचा देव तुम्हास पूर्ण पवित्र करो; आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचे येणे होईल तेव्हा तुमचा आत्मा, जीव आणि शरीर पूर्ण निर्दोष राहो. तुम्हास जो बोलवत आहे तो विश्वासू आहे; तो हे करीलच.
सामायिक करा
1 थेस्सल 5 वाचा1 थेस्सल 5:23-24 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
परमेश्वर स्वतः जे शांतीचे परमेश्वर आहेत, ते तुम्हाला परिपूर्णतेने पवित्र करोत. आपले प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत तुमचा पूर्ण आत्मा, जीव आणि शरीर निर्दोष राखली जावोत. ज्यांनी तुम्हाला पाचारण केले आहे ते विश्वासू आहेत आणि ते करतीलच.
सामायिक करा
1 थेस्सल 5 वाचा1 थेस्सल 5:23-24 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
शांतीचा देव स्वत: तुम्हांला परिपूर्णपणे पवित्र करो; आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या आगमनसमयी तुमचा आत्मा, जीव व शरीर ही निर्दोष अशी संपूर्णपणे राखली जावोत. तुम्हांला पाचारण करणारा विश्वसनीय आहे; तो हे करीलच.
सामायिक करा
1 थेस्सल 5 वाचा