1 तीमथ्य 1:9-10
1 तीमथ्य 1:9-10 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि आपल्याला हे ठाऊकच आहे की, नियमशास्त्र हे नीतिमान लोकांसाठी केलेले नाही तर आज्ञाभंग करणाऱ्या आणि विद्रोही, पापी, भक्तिहीन, अधर्मी, अशुद्ध, वडिलांना ठार मारणारे व आईला ठार मारणारे, मनुष्यघातक जारकर्मी, समलैंगीक, मनुष्यांचा व्यापार करणारे, खोटारडे, खोटी शपथ वाहणारे यांच्यासाठी आहे आणि शुद्ध शिकवणीविरुद्ध जर काही दुसरे असेल तर त्यासाठीही आहे.
1 तीमथ्य 1:9-10 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
नीतिमानांसाठी नियमशास्त्र तयार करण्यात आलेले नाही; तर आज्ञा मोडणारे, विद्रोही, भक्तिहीन व पापी, अपवित्र आणि अधर्मी, आईवडीलांवर हल्ला करणारे, आणि खून करणारे जारकर्मी, समलैंगिक, दासांचा व्यापार करणारे, लबाड, खोटी शपथ वाहणारे यांच्यासाठी—आणि इतर जे काही शुद्ध शिक्षणाविरुद्ध आहे.
1 तीमथ्य 1:9-10 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
आणि हेही ठाऊक आहे की, नियमशास्त्र नीतिमानांसाठी केलेले नाही, तर अधर्मी व अनावर, भक्तिहीन व पापी, अपवित्र व अमंगळ, बापाला ठार मारणारे व आईला ठार मारणारे, मनुष्यहत्या करणारे, जारकर्मी, पुंमैथुनी, गुलामांचा व्यापार करणारे, लबाड, खोटी शपथ वाहणारे ह्यांच्यासाठी आणि जे काही सुशिक्षणाविरुद्ध आहे त्यासाठी केलेले आहे
1 तीमथ्य 1:9-10 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
तसेच हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की, नियमशास्त्र निर्दोष लोकांसाठी केलेले नाही, तर कायदा न पाळणारे व आज्ञाभंग करणारे, भक्तिहीन व पापी, अपवित्र व अमंगल, बापाला व आईला ठार मारणारे, मनुष्यहत्या करणारे, जारकर्मी, लैंगिक विपर्यास करणारे, गुलामांचा व्यापार करणारे, लबाड, खोटी शपथ वाहणारे व शिकवणीविरुद्ध वागणारे ह्यांच्यासाठी केलेले आहे.