२ इतिहास 30:9
२ इतिहास 30:9 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तुम्ही परमेश्वराकडे परत फिरलात तर ज्याने तुमच्या भाऊबंदांना आणि लेकरांना कैद करून नेले त्यांना दयेचा पाझर फुटेल आणि तुमचे भाऊबंद आणि लेकरे आपल्याकडे परत येतील. परमेश्वर तुमचा देव दयाळू आणि कृपाळू आहे. त्याच्या आसऱ्याला गेलात तर तो तुमचा धिक्कार करणार नाही.”
२ इतिहास 30:9 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जर तुम्ही याहवेहकडे परत याल, तर तुमच्याबरोबर असणारे इस्राएली लोक आणि तुमच्या मुलाबाळांवर त्यांना कैद करणाऱ्यांकडून दया करण्यात येईल आणि ते या देशात परत येतील, कारण तुमचे परमेश्वर याहवेह हे कृपाळू आणि दयाळू आहेत. जर तुम्ही त्यांच्याकडे परत आलात तर ते तुमच्यापासून मुख फिरविणार नाहीत.”
२ इतिहास 30:9 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तुम्ही आता परमेश्वराकडे वळला तर ज्यांनी तुमचे भाऊबंद व तुमची मुले पाडाव करून नेली आहेत ते त्यांच्यावर दया करतील व ती ह्या देशास परत येतील, कारण तुमचा देव परमेश्वर कृपाळू व दयाळू आहे, आणि तुम्ही त्याच्याकडे वळला तर तो आपले मुख तुमच्याकडून फिरवणार नाही.”