निर्गम 9:18-19
निर्गम 9:18-19 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
म्हणून उद्या याच वेळेस मी गारांचा असा काही वाईट वादळी वर्षाव मिसरावर आणीन की असा गारांचा वादळी वर्षाव मिसर राष्ट्राची स्थापना झाल्यापासून कधी आला नाही. तर आता माणसे पाठवून रानांतून तुझी गुरेढोरे व दुसरे जे काही रानात असेल ते आण. कारण जर एखादा मनुष्य किंवा पशू शेतात राहील तर तो मारला जाईल. जे जे तुम्ही तुमच्या घरात गोळा करून ठेवणार नाही त्यावर गारांचा भडीमार पडेल.”
निर्गम 9:18-19 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
म्हणून उद्या याच वेळेला, इजिप्तची स्थापना झाली तेव्हापासून कधी झाला नाही अशा भयानक गारांचा वर्षाव मी करेन. म्हणून आपआपली जनावरे आणि तुमचे जे काही रानात आहे ते आत आश्रयास आणायला सांग, कारण जे मनुष्य व जनावरे आत आली नाहीत, त्या सर्वांवर गारा पडतील व ते मरतील.”
निर्गम 9:18-19 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
पाहा, उद्या ह्या वेळेस मी गारांची अशी भयंकर वृष्टी करीन की मिसरी राष्ट्राची स्थापना झाल्यापासून आजवर तशी वृष्टी झाली नाही. तर आता माणसे पाठवून रानातून तुझी जनावरे व दुसरे जे काही रानात असेल ते आण; जी माणसे व गुरे घरी आसर्यास न आणल्यामुळे रानात सापडतील त्यांच्यावर गारांची झोड पडून ती मरतील.”’