मार्क 5:35-36
मार्क 5:35-36 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
येशू हे बोलत आहे इतक्यात सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घराकडून काही माणसे येऊन त्यास म्हणाली, “आपली मुलगी मरण पावली, आता गुरुजींना त्रास कशाला देता?” परंतु येशू त्यांच्या बोलण्याकडे लक्ष्य न देता, सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला, “भिऊ नकोस. विश्वास मात्र धर.”
मार्क 5:35-36 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
येशू अजून बोलतच होते, तोच सभागृहाचा अधिकारी याईर याच्या घरून काही लोक आले व म्हणाले, “तुमची कन्या मरण पावली आहे,” आणि “आता गुरुजींना त्रास देण्यात अर्थ नाही.” त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून येशू सभागृहाच्या अधिकार्याला म्हणाले, “भिऊ नकोस, फक्त विश्वास ठेव.”
मार्क 5:35-36 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
तो हे बोलत आहे इतक्यात सभास्थानाच्या अधिकार्याच्या घराकडून काही माणसे येऊन त्याला म्हणाली, “आपली मुलगी मरण पावली, आता गुरूजींना त्रास कशाला देता?” परंतु येशू त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता, सभास्थानाच्या अधिकार्याला म्हणाला, “भिऊ नकोस, विश्वास मात्र धर.”
मार्क 5:35-36 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
तो हे बोलत आहे इतक्यात सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घरून काही जण येऊन त्याला म्हणाले, “तुमची मुलगी मरण पावली आहे. आता गुरुजींना त्रास का देता?” परंतु त्यांच्या बोलण्याकडे लक्ष न देता येशू सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला, “भिऊ नकोस, फक्त विश्वास ठेव.”