प्रकटी 12:1-2
प्रकटी 12:1-2 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
नंतर स्वर्गात एक मोठे चिन्ह दृष्टीस पडले ते हे : एक स्त्री दिसली, ती सूर्यतेज पांघरलेली होती आणि तिच्या पायांखाली चंद्र व तिच्या मस्तकावर बारा तार्यांचा मुकुट होता. ती गरोदर होती आणि ‘वेणा देऊन प्रसूतीच्या कष्टांनी ओरडत होती.’
प्रकटी 12:1-2 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि स्वर्गात एक महान चिन्ह दिसले; सूर्य परिधान केलेली एक स्त्री, तिच्या पायाखाली चंद्र होता आणि तिच्या डोक्यावर बारा ताऱ्यांचा मुकुट होता. ती स्त्री गरोदर होती व बाळंतपणाच्या वेदनांनी ती ओरडत होती.
प्रकटी 12:1-2 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
मग स्वर्गामध्ये एक अलौकिक चिन्ह मला दिसले. सूर्य परिधान केलेली एक स्त्री मी पाहिली. तिच्या पायाखाली चंद्र होता. तिच्या डोक्यावर बारा तार्यांचा मुकुट होता. ती गर्भवती होती आणि प्रसूतिची वाट पाहत प्रसूतिवेदनांनी ओरडत होती.
प्रकटी 12:1-2 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
नंतर स्वर्गात एक महान व रहस्यमय दृश्य दिसले. तिथे एक स्त्री दिसली. तिने सूर्यतेज पांघरलेले होते आणि तिच्या पायांखाली चंद्र व तिच्या मस्तकावर बारा ताऱ्यांचा मुकुट होता. ती गरोदर होती आणि वेणा देऊन प्रसूतीच्या वेदनांनी ओरडत होती.