प्रकटी 12:14-16
प्रकटी 12:14-16 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
त्या स्त्रीने रानात आपल्या ठिकाणाकडे उडून जावे म्हणून तिला मोठ्या गरुडाचे दोन पंख देण्यात आले होते; तेथे सर्पापासून सुरक्षित राहत असताना एक ‘काळ, दोन काळ व अर्धकाळ’ तिचे पोषण व्हायचे होते. मग त्या स्त्रीने वाहून जावे म्हणून तिच्या मागोमाग त्या सर्पाने आपल्या तोंडातून नदीसारखा पाण्याचा प्रवाह सोडला; परंतु स्त्रीला भूमीने साहाय्य केले; तिने ‘आपले तोंड उघडून’ अजगराने आपल्या तोंडातून सोडलेली नदी ‘गिळून टाकली.’
प्रकटी 12:14-16 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
परंतु स्त्रीने सापाच्या पुढून तिच्या रानातल्या ठिकाणी उडून जावे म्हणून तिला मोठ्या गरुडाचे दोन पंख देण्यात आले; आणि तेथे ती सर्पापासून सुरक्षित राहत असताना एक काळ, दोन काळ आणि अर्धकाळ तिचे पोषण केले जाईल. आणि ती स्त्री पुराने वाहून जाईल असे करावे म्हणून, त्या सर्पाने तिच्या मागोमाग आपल्या तोंडातून नदीसारखे पाणी ओतले. पण भूमीने स्त्रीला मदत केली; आणि अजगराने तोंडातून सोडलेली नदी भूमीने तोंड उघडून गिळून घेतली.
प्रकटी 12:14-16 मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
पण तिच्यासाठी अरण्यात तयार केलेल्या जागी तिने उडून जावे म्हणून तिला मोठ्या गरुडाच्या पंखांसारखे दोन पंख देण्यात आले. तेथे तिचे साडेतीन वर्षे पोषण व त्या अजगरापासून रक्षण व्हावयाचे होते. तेव्हा त्या स्त्रीचा नायनाट करण्यासाठी त्या सर्पाच्या तोंडातून नदीच्या पाण्यासारखा एक महापूर बाहेर आला व तिच्या रोखाने जोरात वाहत गेला. पण तेवढ्यात पृथ्वीने आपले तोंड उघडले आणि तो महापूर गिळून घेऊन अजगरापासून त्या स्त्रीचा बचाव केला.
प्रकटी 12:14-16 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
त्या स्त्रीने रानात आपल्या ठिकाणाकडे उडून जावे म्हणून तिला मोठ्या गरुडाचे दोन पंख देण्यात आले होते. तेथे अजगराच्या हल्ल्यापासून सुरक्षित राहत असताना साडे तीन वर्षे तिचे पोषण केले जाणार होते. मग त्या स्त्रीने वाहून जावे म्हणून तिच्या मागोमाग त्या सर्पाने आपल्या तोंडातून पाण्याचा प्रवाह सोडला. परंतु स्त्रीला भूमीने साहाय्य केले, तिने तोंड उघडून अजगराने त्याच्या तोंडातून सोडलेले पाणी गिळून टाकले.