तीत 2:11-12
तीत 2:11-13 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
सर्व माणसांना तारण देणारी देवाची कृपा प्रकट झाली आहे. ती कृपा आपल्याला असे शिकविते की, ज्या धन्य दिवसाची आम्ही आशेने प्रतीक्षा करतो म्हणजे आपला थोर देव व तारणारा येशू ख्रिस्त ह्याचे वैभव प्रकट होण्याच्या दिवसाची वाट पाहत आपण भक्तिहीनता व ऐहिक वासनांना नाकारून सांप्रतच्या युगात मर्यादेने, नीतीने व भक्तीने वागावे.
तीत 2:11-12 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
कारण, सर्व लोकांस तारणारी देवाची कृपा प्रकट झाली आहे. ती आपल्याला असे शिकवते की, अभक्तीचा व जगीक वासनांचा त्याग करून, आपण या आताच्या युगात संयमाने, नीतिने व सुभक्तीने वागले पाहिजे.
तीत 2:11-12 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
कारण आता सर्वांना तारण देणारी परमेश्वराची कृपा प्रकट झाली आहे. ती कृपा आपल्याला असे शिकविते की, आम्ही अभक्ती व ऐहिक वासनांना “नाही” म्हणून, आताच्या युगात आत्मसंयमाने, नीतीने व सुभक्तीने जगावे
तीत 2:11-13 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
कारण सर्व माणसांना तारण देणारी देवाची कृपा प्रकट झाली आहे; ती आपल्याला असे शिकवते की, धन्य आशाप्राप्तीची म्हणजे आपला थोर देव व तारणारा असा जो येशू ख्रिस्त त्याचा गौरव प्रकट होण्याची वाट पाहत आपण अभक्तीला व ऐहिक वासनांना नाकारून सांप्रतच्या युगात मर्यादेने, नीतीने व सुभक्तीने वागावे.