तीत 2:13-14
तीत 2:12-14 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
ज्या धन्य दिवसाची आम्ही आशेने प्रतीक्षा करतो म्हणजे आपला थोर देव व तारणारा येशू ख्रिस्त ह्याचे वैभव प्रकट होण्याच्या दिवसाची वाट पाहत आपण भक्तिहीनता व ऐहिक वासनांना नाकारून सांप्रतच्या युगात मर्यादेने, नीतीने व भक्तीने वागावे. आपल्याला सर्व स्वैराचारापासून मुक्त करण्यासाठी आणि चांगल्या कामांत तत्पर असे आपले स्वतःचे लोक स्वतःकरिता शुद्ध करून ठेवण्यासाठी त्याने स्वतःला समर्पित केले.
तीत 2:13-14 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
आणि आपल्या धन्य आशेची, म्हणजे आपला महान देव व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या गौरवी आगमनाची प्रतीक्षा करावी; आपल्यासाठी त्याने स्वतःचे दान केले ते ह्यासाठी की, आपली सर्व अनाचारातून सुटका करावी आणि चांगल्या कामात आवेशी असलेले आपले स्वतःचे लोक आपणासाठी शुद्ध करावेत.
तीत 2:13-14 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
आणि धन्य आशेची, म्हणजे येशू ख्रिस्त आपले महान परमेश्वर आणि तारणाऱ्यांचे गौरव प्रकट होण्याची वाट पाहावी. त्यांनीच स्वतःचे बलिदान देऊन आपल्याला प्रत्येक अधर्मापासून मुक्त केले, त्यांनी स्वतःसाठी शुद्ध करून त्यांच्या चांगल्या कार्यासाठी आपल्याला उत्साही प्रजा बनविले.
तीत 2:12-14 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
धन्य आशाप्राप्तीची म्हणजे आपला थोर देव व तारणारा असा जो येशू ख्रिस्त त्याचा गौरव प्रकट होण्याची वाट पाहत आपण अभक्तीला व ऐहिक वासनांना नाकारून सांप्रतच्या युगात मर्यादेने, नीतीने व सुभक्तीने वागावे. त्याने स्वतःला आपल्याकरता दिले, ह्यासाठी की, ‘त्याने खंडणी भरून’ ‘आपल्याला सर्व स्वैराचारापासून मुक्त करावे,’ आणि चांगल्या कामांत तत्पर असे आपले ‘स्वतःचे लोक आपणासाठी शुद्ध करून ठेवावे.’