तीत 2:7-8
तीत 2:7-8 पवित्र शास्त्र CL New Testament (BSI) (MACLBSI)
सर्व गोष्टींविषयी चांगल्या वर्तणुकीचा आदर्श, असे स्वतःला सादर कर. तुझी शिकवण प्रामाणिक व गंभीर स्वरूपाची असू दे. टीका करता येणार नाही असे उचित शब्द वापर म्हणजे विरोध करणाऱ्याला आपल्याविषयी काही वाईट बोलण्यास जागा नसल्यामुळे लाज वाटावी.
तीत 2:7-8 इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी (IRVMAR)
तू सर्व गोष्टींत चांगल्या कामांचे उदाहरण असे स्वतःला दाखव; तुझ्या शिक्षणात निर्मळपणा, गंभीरता, आणि निरपवाद चांगली शिकवण दिसू दे, म्हणजे तुझ्यावर टिका करणार्याला तुझ्याविषयी बोलण्यास काही वाईट न मिळून तो लज्जित व्हावा.
तीत 2:7-8 पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती (MRCV)
जे चांगले ते करून, तू त्यांना प्रत्येक गोष्टींत कित्ता घालून दे. तुझ्या शिकविण्यात प्रामाणिकपणा, गांभीर्य दाखव. दोष लावता येणार नाही अशा सद्भाषणाने युक्त तुझी शिकवण असावी; यासाठी की जे तुला विरोध करतील, त्यांना आपल्याविषयी वाईट बोलण्यास जागाच नसल्यामुळे लाज वाटावी.
तीत 2:7-8 पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI) (MARVBSI)
सर्व गोष्टींविषयी चांगल्या कामाचा कित्ता असे स्वतःला दाखव; शुद्धता, गांभीर्य व ज्याला दोष लावता येत नाही असे सद्भाषण ह्यांनी तुझे शिक्षण युक्त असू दे; ह्यासाठी की, विरोध करणार्याला आपल्याविषयी काही वाईट बोलण्यास जागा नसल्यामुळे लाज वाटावी.