YouVersion लोगो
सर्च आयकॉन

ल्यूक आणि अ‍ॅक्ट्समधून फेरफटकानमुना

ल्यूक आणि अ‍ॅक्ट्समधून फेरफटका

40 पैकी 27 दिवस

या भागामध्ये, ल्यूक कार्नेलिअस नावाच्या रोमन अधिकाऱ्याची ओळख करून देतो, जो ज्यू लोकांच्या प्रत्येक रोमन व्यवसायाबद्दलच्या तिरस्काराचे प्रतिनिधित्व करतो.  कार्नेलिअसमध्ये एक देवदूत अवतरतो आणि त्याला पीटर नावाच्या व्यक्तीला बोलाविण्यास सांगतो. जो जोपामध्ये सिमॉनच्या घरामध्ये राहतो जेव्हा कार्नेलिअस सांगितल्याप्रमाणे दूताला पाठवतो, देवदूताने जिथे सांगितले असते तिथेच पीटर असतो, ज्यूंच्या प्रार्थनेच्या तासामध्ये सहभागी होत असतो, जेव्हा अचानक त्याला एक चमत्कारिक दृष्टांत मिळतो. या दृष्टांतामध्ये, ईश्वर त्याला जनावरांच्या एका कळपामध्ये नेतो जो ज्यू लोकांना खाणे निषिद्ध असते आणि पीटरला सांगतो, ""यांना खा."" पीटर प्रत्युत्तर देतो, ""जे अशुद्ध आहे ते मी कधीच  खाणार नाही."" परंतू ईश्वर उत्तर देतो, ""जे मी बनविले आहे त्याला अशुद्ध म्हणू नको."" या दृष्टांताची तीन वेळा पुनरावृत्ती होते आणि गोंधळलेल्या पीटरला तिथेच सोडून देतो.  


पीटर अजूनही दृष्टांताबद्दल विचार करत असताना, पीटरने परत जाऊन कार्नेलिअसच्या घरी भेट देण्याचे आमंत्रण घेऊन दूत तिथे येतो.  यावेळी, त्याने जो दृष्टांत पाहिलेला असतो त्याबद्दल पीटरला जाणीव होऊ लागते. पीटरला हे माहित असते की ज्यू नसलेल्या घरी जाणे म्हणजे आचारपद्धतीं अशुद्ध होण्याचा धोका आहे, त्यामुळे नेहमीसारखे तो हे आमंत्रण नाकारतो. पण त्या दृष्टांताच्या माध्यमातून, कोणालाही अशुद्ध म्हणू नये हे पीटरला समजण्याची  ईश्वर मदत करतो; येशूवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक माणसाला शुद्ध करण्याची शक्ती ईश्वराने स्वतःकडे ठेवली आहे.  त्यामुळे कोणत्याही आक्षेपाशिवाय, पीटर कार्नेलिअसच्या घरी जातो आणि येशूच्या शुभ वार्ता सामायिक करतो–– त्याचा मृत्यू, पुनरुद्धार, आणि जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्या सर्वांबद्दल क्षमाशीलता. पीटर बोलत असताना त्याच वेळेस, पवित्र आत्मा कार्नेलिअस आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबियांवर वर्षाव करते, जसे पेनेकॉस्टच्या दिवशी येशूच्या ज्यू अनुयायांवर केला होता! येशूच्या म्हणण्यानुसार, सर्व लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ही चळवळ सुरु आहे. 


दिवस 26दिवस 28

या योजनेविषयी

ल्यूक आणि अ‍ॅक्ट्समधून फेरफटका

ल्यूक आणि अ‍ॅक्ट्समधून फेरफेटका व्यक्ती, लहान गट आणि कुटुंबांना ल्यूक आणि अ‍ॅक्ट्सची पुस्तके 40 दिवसांत वाचण्याची प्रेरणा देते. सहभागींना जीझसचा सामना करण्यासाठी आणि ल्युकच्या बुद्धिमान साहित्यिक रचना आणि वैचारिक प्रवाहांत सहभागी करण्यासाठी, या योजनेत अ‍ॅनिमेटेड व्हिडिओ आणि वैचारिक सारांश समाविष्ट आहेत.

More

आम्ही ही योजना प्रदान केल्याबद्दल BibleProject चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया येथे भेट द्या: https://bibleproject.com