YouVersion लोगो
सर्च आयकॉन

ल्यूक आणि अ‍ॅक्ट्समधून फेरफटकानमुना

ल्यूक आणि अ‍ॅक्ट्समधून फेरफटका

40 पैकी 28 दिवस

एक्ट्सच्या या मुद्द्यावर, अँटिऑकच्या व्यापारी शहरामध्ये ज्यू नसलेल्या अधिक लोकांनी येशूचे अनुसरण करण्यास कशी सुरुवात केली आहे याचे नवीन अहवाल येत आहेत. बाहेर येणाऱ्या गोष्टींची शहानिशा करण्यासाठी शिष्यांनी जेरुसलेममध्ये बर्नाबास नावाच्या व्यक्तीला पाठवतात. जेव्हा तो अँटिऑकमध्ये पोहोचतो, त्याला दिसते की संपूर्ण जगातील बऱ्याच देशांमधील लोक येशूचा मार्ग शिकत आहेत.   तिथे बरेच नवीन अनुयायी होते आणि खूप गोष्टी करायच्या होत्या, त्यामुळे बर्नाबास शौलला त्याच्याबरोबर शिकवण्यासाठी वर्षभरासाठी अँटिऑकमध्ये नेमतो. 


अँटिऑक अशी जागा आहे जिथे येशूच्या अनुयायांना पहिल्यांदा ख्रिस्ती असे संबोधण्यात आले, याचा अर्थ ""जे ख्रिस्त आहेत."" अँटिऑकमधील चर्च हा पहिला आंतरराष्ट्रीय येशू समुदाय आहे. आता हे चर्च फक्त जेरुसलेममधील मेसॅनिक ज्यूंसाठी बनलेले चर्च राहिलेले नाही; आता ही वेगाने जगभरात पसरणारी एकाधिक चळवळ बनलेली आहे.  त्यांच्या त्वचेचा रंग, भाषा, आणि संस्कृती भिन्न आहे, पण वधस्तंभावरील आणि वृद्धिंगत झालेला येशू, सगळ्या देशांचा राजा ही शुभ वार्ता केंद्रस्थानी असलेला त्यांचा विश्वास समान आहे. पण चर्चचा संदेश आणि त्यांचे नवीन मार्ग हे गोंधळात टाकणारे आहेत, आणि सामान्य रोमन नागरिकांना धमकी देणारेसुद्धा आहेत. आणि रोमन साम्राज्याचा कठपुतळी असलेल्या राजा हेरॉडने ख्रिस्तांबरोबर गैरवर्तन आणि त्यांना फाशी द्यायला सुरुवात केली.  त्याने चालवलेला हा ख्रिस्तांचा छळ काही ज्यू नेत्यांना अधिक सुखावणारा आहे असे राजाला दिसते, तो अधिकाधिक ही गोष्ट करतो, जिथे याची परिणीती अखेरीस पीटरला पकडण्यात होते. पीटरचे आयुष्य हे एका सीमारेषेवर होते, पण त्याचे मित्र उत्कटतेने त्याच्या सुटण्याची प्रार्थना करीत होते. एका संतप्त जमावाच्या हाती पीटरला देण्याची हेरॉडची योजना असताना त्याच्या आधीच्या रात्री, एक देवदूत त्याच्या कारागृहात येतो, त्याच्या साखळ्या तोडतो आणि त्याला तुरुंगामधून बाहेर काढतो. 


दिवस 27दिवस 29

या योजनेविषयी

ल्यूक आणि अ‍ॅक्ट्समधून फेरफटका

ल्यूक आणि अ‍ॅक्ट्समधून फेरफेटका व्यक्ती, लहान गट आणि कुटुंबांना ल्यूक आणि अ‍ॅक्ट्सची पुस्तके 40 दिवसांत वाचण्याची प्रेरणा देते. सहभागींना जीझसचा सामना करण्यासाठी आणि ल्युकच्या बुद्धिमान साहित्यिक रचना आणि वैचारिक प्रवाहांत सहभागी करण्यासाठी, या योजनेत अ‍ॅनिमेटेड व्हिडिओ आणि वैचारिक सारांश समाविष्ट आहेत.

More

आम्ही ही योजना प्रदान केल्याबद्दल BibleProject चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया येथे भेट द्या: https://bibleproject.com