सामर्थ्याने आणि धैर्याने जगा!नमुना
"तो आपल्यासाठी सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक करतो.”
आपल्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात देवाचे नियंत्रण आहे. विश्वासणारे या नात्याने आपल्या फायद्यासाठी कार्य करण्यासाठी तो कोणत्याही परिस्थितीची मांडणी करण्यास पूर्णपणे सक्षम आहे.
“परंतु आपल्याला ठाऊक आहे की, देवावर प्रीती करणार्यांना म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्यांना देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात.” रोम. ८:२८
जीवनातील सर्वात गुंतागुंतीची आव्हाने हाताळण्यास तो अधिक सक्षम आहे आणि आपल्या जीवनासाठी त्याची योजना पूर्ण करण्याच्या मार्गावर आपल्याला घेऊन जाईल. आपण त्याच्यावर विश्वास ठेवावा एवढीच त्याची इच्छा आहे.
“तू आपल्या अगदी मनापासून परमेश्वरावर भाव ठेव, आपल्याच बुद्धीवर अवलंबून राहू नकोस; तू आपल्या सर्व मार्गांत त्याचा आदर कर, म्हणजे तो तुझा मार्गदर्शक होईल.” नीतिसूत्रे ३:५-६
देवावर विश्वास ठेवणे म्हणजे वैयक्तिक जबाबदारी आणि चांगले नेतृत्व टाळणे असे होत नाही. तर वैयक्तिक जबाबदारी आणि त्याच्यावर विश्वास ठेवणे य दोन्ही गोष्टी एकत्र कार्य करतात. जेव्हा आपण आपली भूमिका पार पाडतो, तेव्हा देव नेहमीच आपले कार्य करण्यासाठी आणि आपले प्रभावीपणे नेतृत्व करण्यासाठी विश्वासू असतो.
बऱ्याच प्रकरणांमध्ये, देवाचे नेतृत्व आपल्या परिस्थितीत "दरवाजे" उघडण्याच्या आणि बंद करण्याच्या स्वरूपात येते. इतर वेळी, बरे होण्यासाठी, चमत्कार करण्यासाठी किंवा अशक्य गोष्ट साध्य करण्यासाठी आपल्या परिस्थितीला देवाच्या दैवी हस्तक्षेपापेक्षा इतर कुठल्याचा गोष्टीची कमी नसते.
येशूने त्यांच्याकडे न्याहाळून पाहून म्हटले, “माणसांना हे अशक्य आहे, ‘देवाला’ तर ‘सर्व शक्य आहे’.” मत्तय १९:२६
असाध्य आजाराला सामोरे जाणे असो, आर्थिक संकट असो किंवा एखाद्या प्रियजनास अनपेक्षितपणे गमावणे असो, देव या काळात अलौकिकपणे कार्य करण्यास सक्षम असतो.
पवित्र आत्म्याद्वारे दु:खाचे विजयात आणि अडचणीचे आनंदात रूपांतर करण्यात देव तज्ञ आहे. देव आजही "चमत्कार-करण्याच्या कार्यात व्यस्त आहे" याबद्दल कधीही शंका घेऊ नका. देव कोणत्याही अशक्य परिस्थितीत हस्तक्षेप करण्यास समर्थ आहे!
पवित्र शास्त्र
या योजनेविषयी
तुम्ही कधीच एकटे नाही. तुम्ही एका दिवसापासून किंवा 30 वर्षांपासून तुमच्या ख्रिस्ती विश्वासात आहात, असाल. जीवन तुम्हाला ज्या गोष्टींचे आव्हान देऊ शकते त्या सर्वांसाठी हे सत्य ठामपणे उभे आहे.. या योजनेत देवाची मदत प्रभावीपणे कशी स्वीकारावी हे शिका. डेव्हिड जे. स्वांड यांनी लिहिलेल्या “या जगातून बाहेर; विकास आणि हेतूसाठी ख्रिस्ती मार्गदर्शिका" या पुस्तकातून हा मजकूर घेण्यात आला आहे.
More
ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही Twenty20 Faith, Inc. चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: https://www.twenty20faith.org/devotion1?lang=mr