YouVersion लोगो
सर्च आयकॉन

सुटका/मुक्ती नमुना

सुटका/मुक्ती

7 पैकी 1 दिवस

देव मुक्ती/सुटका देण्यासाठी येतो

आदाम आणि हव्वेचे एदेन बागेत सर्वकाही सुरळित सुरू होते. त्यांच्या उत्पन्नकर्त्याशी उत्तम नाते,प्रत्येक सजीव आणि श्वास घेणाऱ्या प्राणीमात्रांवर अधिकार,त्यांच्या सभोवतालचे निर्लेप सौंदर्य आणि कपड्यांचा कोणताही अतिरिक्त खर्च नाही. ते अपराधबोध,लज्जा,नकारात्मकता किंवा भीती यांनी अबाधित होतो. असे जगण्याची कल्पना करा. हे परिपूर्ण शाश्वत सुखाचे चित्र आहे. त्यांच्या मनात पेरण्यात आलेल्या शंकेमुळे,लबाडीवर विश्वास ठेवल्यामुळे आणि पालटता येणार नाही अशा आज्ञाभंगाच्या कृतीमुळे हे सर्व काही अगदी क्षणात बदलून गेले. सर्व काही हरवल्यासारखे वाटत होते - मनुष्य आणि देव यांच्यातील अखंड,सलोख्याचे नाते तुटले होते आणि परिपूर्ण जग आता मोडलेले आणि सदोष दिसत होते. किती दुःखद शोकांतिका - तरीही सर्व गमावलेले नव्हते. देव एक सिद्ध पालक आहे,त्याची एक योजना होती जी लगेच अमलात आली. त्याने पुरुष आणि स्त्रीला प्राण्यांचे कातडे घातले जेणेकरून त्यांची लज्जा झाकली जावी आणि नंतर त्यांना एदेन बागेतून बाहेर जगात पाठवले.

अकथित तरीही स्पष्ट वस्तुस्थिती ही आहे की देवाने त्याच्या लोकांना त्यांच्या स्वतःच्या पापाच्या परिणामांपासून वाचवण्यासाठी आयोजित केलेल्या अनेक सुटकांपैकी हे पहिले होते. आदाम आणि हव्वेला वस्त्र घालण्यासाठी देवाला प्राण्यांचे बलिदान करावे लागणार होते आणि रक्त लागणार होते. हे रक्ताचे बलिदान अशा प्रकारचे पहिले बलिदान होते,जे नंतर कोणीही केलेल्या पापांसाठी प्रायश्चित्त आणि प्रत्यास्थापन म्हणून मोशेद्वारे औपचारिकरित्या स्थापित केले जाणार होते. त्यांना एदेन बागेतून बाहेर पाठवण्यामध्ये देवाने त्यांच्यावर सर्वात मोठी कृपा केली,कारण,जर का ते तेथे राहिले असते तर त्यांनी अनवधानाने जीवनाच्या वृक्षाचे फळ तोडले असते आणि देव न करो,त्यांनी अमरत्व देखील धारण केले असते. याचे चित्रण करा- आपण हळूहळू वयोवृद्ध होत आहोत पण मरत नाही! आम्हाला पृथ्वीवर नरकात टाकण्यात आले असते. देवाने त्याच्या अत्यंत दयेमुळे आपल्याला मृत्यूची देणगी दिली जी पृथ्वीच्या दुःखापासून एक मधूर सुटका आणि स्वर्गाची आशा आहे,जी वेदनारहित,आनंदाने भरलेल्या अस्तित्वाने चिन्हांकित करण्यात आली आहे.

आज आपण कदाचित एदेन बागेसारख्या सिद्ध परिस्थितीत राहत नाही. वस्तुतः,आपण युद्ध,दुष्काळ आणि शोकांतिकेने ग्रासलेल्या जगात राहतो. ज्या देवाने आदाम आणि हव्वेची सुटका केली,तो त्याच्या अमर्याद आणि अपार प्रेमाने आणि दयेने त्यांच्या सर्व मुलामुलींना सोडवीत आहे.

विचार:

जर देव आदाम आणि हव्वा यांना त्यांच्या अंधकारमय परिस्थितीतून सोडवू शकला तर तो तुमच्यासाठी देखील ते करू शकतो.

पवित्र शास्त्र

दिवस 2

या योजनेविषयी

सुटका/मुक्ती

ख्रिस्ताला आमच्या मुक्ततेसाठी पाठवून देवाने आमच्यासाठी जे काही केले त्या सर्व गोष्टींकडे मागे वळून पाहून त्यावर चिंतन करण्याचा ख्रिसमस हा योग्य समय आहे. तुम्ही हे भक्तीपर वाचन करत असतांना, मी प्रार्थना करतो की तुम्ही तुमची सुटका/मुक्ती आठवल आणि नवीन वर्षात या आत्मविश्वासाने पदार्पण कराल की तो तुम्हाला पुढे असलेल्या मार्गावर चालण्यासाठी ज्या गोष्टींपासून सोडवणे आवश्यक आहे त्यापासून तो तुम्हाला पुन्हा सोडवील.

More

ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही Christine Jayakaran चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: https://www.instagram.com/wearezion.in/