YouVersion लोगो
सर्च आयकॉन

सुटका/मुक्ती नमुना

सुटका/मुक्ती

7 पैकी 4 दिवस

संदेष्टे सुटकेविषयी बोलले

इस्राएलचे नेते त्यांच्या लोकांना बंदिवासात घेऊन गेले,त्याचवेळी संदेष्ट्यांनी त्यांस बंदिवासासाठी आणि बंदिवासानंतरच्या जीवनासाठी तयार केले. त्यांचे बहुतांशी संदेश विनाशाचे आणि निरोशेचे होते,पण सर्वत्र आशेची किरणे चमकत होती. देव त्याच्या संदेष्ट्यांशी बोलला ज्यांनी संदेश कितीही निराशाजनक व संकटाची सूचना देणारे असले तरीही विश्वासूपणे त्याचे वचन लोकांपर्यंत पोहोचविले. लोकांचा प्रतिसाद जाणीव करून घेणारा आणि नम्रतेचा नव्हता,तर घोर उदासीनतेचा आणि तटस्थेचा होता. काही पातळीवर त्यांनी जीवंत देवाच्या मागे चालणे सोडून दिले होते आणि लाकडाच्या व दगडाच्या मूर्तीची उपासना करू लागले होते. त्यांनी एका खऱ्या देवाच्या उपासनेसाठी उठून दिसण्याऐवजी त्यांच्या बंदिवासाच्या देशांत मिसळण्याची निवड केली होती. त्यांच्या आध्यात्मिक जीवनात मागे पडल्यानंतरही संदेष्टे त्याच्या लोकांसाठी देवाच्या निरंतर प्रीतीविषयी सांगत राहिले. त्यांच्यावर येणाऱ्यादेवाच्या न्यायदंडाकडे राष्ट्राचे लक्ष वेधून घेण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केला. त्यांचा हट्टी,आज्ञा मोडणारा स्वभाव आणि स्पष्ट पापीपणाचा परिणाम म्हणून ते या न्यायदण्डास पात्र होते. देवाचे लोक स्पष्टपणे बोलले आणि त्याचा परिणाम त्यांना सहन करावा लागला. त्यांस तुच्छे लेखण्यात आले,त्यांचा छळ करण्यात आला,आणि त्यांच्या स्वतःच्या लोकांनी त्यांस परके केले,तरीही हे लोक त्या अग्नीपरीक्षेत धाडसाचे चित्र ठरले. सर्वात दुःखाची गोष्ट म्हणजे त्या देशच्या लोकांत दैवी दृष्टांताचा अभाव होता,इतकेच काय तर त्यांनी दैवी दृष्टांत बाळगणाऱ्यांवर विश्वास ठेवला नाही,आणि म्हणून त्यांच्या शत्रूंच्या हाती त्यांचा नाश झाला. वाचलेल्यांपैकी,फार थोडके लोक भाकीत केल्याप्रमाणे यरूशलेमास परतले. जर कोणी इस्राएलच्या अविश्वासूपणाच्या मूळ कारणाचे निदान केले असते,तर ते असते त्यांच्या देवाबाहेरील गोष्टींवर आणि लोकांवर त्यांचे अवलंबून राहणे. सरळ शब्दांत,त्यांचे अंतःकरण मूर्तिपूजेच्या नादी लागले होते ज्यामुळे ते त्रस्त होते. त्यांचा आवेश आणि स्नेह देवाप्रत नव्हता - म्हणून त्यांची उपासना कमकुवत झाली आणि सरतेशेवटी ते चुकीच्या मार्गास लागले. एकही संदेष्टा त्यांच्या हट्टीपणामुळे त्या लोकांस सोडवू शकला नाही.

विचार:

ईश्वरी दृष्टान्त न झाल्यास लोक अनावर होतात.

दिवस 3दिवस 5

या योजनेविषयी

सुटका/मुक्ती

ख्रिस्ताला आमच्या मुक्ततेसाठी पाठवून देवाने आमच्यासाठी जे काही केले त्या सर्व गोष्टींकडे मागे वळून पाहून त्यावर चिंतन करण्याचा ख्रिसमस हा योग्य समय आहे. तुम्ही हे भक्तीपर वाचन करत असतांना, मी प्रार्थना करतो की तुम्ही तुमची सुटका/मुक्ती आठवल आणि नवीन वर्षात या आत्मविश्वासाने पदार्पण कराल की तो तुम्हाला पुढे असलेल्या मार्गावर चालण्यासाठी ज्या गोष्टींपासून सोडवणे आवश्यक आहे त्यापासून तो तुम्हाला पुन्हा सोडवील.

More

ही योजना प्रदान केल्याबद्दल आम्ही Christine Jayakaran चे आभार मानू इच्छितो. अधिक माहितीसाठी, कृपया भेट द्या: https://www.instagram.com/wearezion.in/