YouVersion လိုဂို
ရွာရန္ အိုင္ကြန္

मत्तय 23

23
शास्त्री अन् परुशी लोकायपासून सावधान
(मार्क 12:38-40; लूका 11:37-52; 20:45-47)
1तवा येशूने गर्दीतल्या लोकायले अन् आपल्या शिष्यायले म्हतलं, 2“मोशेच्या नियमशास्त्राचे शिक्षक अन् परुशी लोकं मोशेच्या नियमाले शिकवायले मजबूत हायत, 3म्हणून, ते तुमाले जे म्हणतील ते करजा, पण त्यायच्या सारखे काम करू नका, कावून कि ते उपदेश देत होते पण त्याचं पालन करत नाई होते. 4ते नियमाच्या एक अशा मोठ्या भारी वस्तुले ज्याले उचलनं कठीण हाय, बांधून त्याले माणसाच्या खांद्यावर ठेवतात, पण स्वता आपल्या बोटाने पण सरकवत नाईत,
5ते आपले सगळे काम लोकांना दाखवण्यासाठी करतात, ते आपल्या पाट्यायले मोठं करतात अन् त्याच्यावर पवित्र ग्रंथाचं वचन लिवून आपल्या शरीरावर बांधतात अन् आपल्या कपड्याच्या झालरी मोठ्या करतात. 6अन् ते जेवणाच्या पंगतीत मुख्य-मुख्य जागा घेतात, अन् धार्मिक सभास्थानात मुख्य जागी बश्याले घेतात. 7अन् बाजारामध्ये नमस्कार अन् माणसायच्या इकून स्वताले गुरुजी म्हणून घेणं त्यायले आवडते.
8पण तुमी स्वताले विश्वासी भावायपासून गुरुजी म्हणून घेऊ नका, कावून कि तुमचा एकच गुरुजी हाय, अन् तुमी सगळे एक हा. 9आपल्या देवबापाले सोडून कोणाले पण पृथ्वीवर बापाच्या पदाचा आदर नाई द्यायचं कावून कि तुमचा एकच देवबाप हाय अन् तो स्वर्गात हाय.
10अन् स्वताले स्वामी पण म्हणू नका, कावून कि तुमचा एकच स्वामी हाय, अर्थात ख्रिस्त हाय. 11जो तुमच्या मध्ये मोठा हाय, तो तुमचा सेवक बनला पायजे. 12जो कोणी आपल्या स्वताला मोठं करीन, तो लायना केला जाईन, अन् जो कोणी आपल्या स्वताला लायना करीन, तो मोठा केला जाईन.”
शास्त्री अन् परुशी लोकायच्या ढोंगापासून सावधान
(मार्क 12:40; लूका 11:39-42,44,52; 20:47)
13“हे कपटी मोशेच्या नियमशास्त्राचे शिक्षकायनो, अन् परुशी लोकोहो तुमच्यावर धिक्कार, तुमी माणसाच्या विरोधात देवाच्या राज्याचे दरवाजे बंद करता, नाई स्वता त्याच्यात प्रवेश करता, अन् दुसऱ्यायले पण प्रवेश करू देत नाई. 14हे कपटी मोशेच्या नियमशास्त्राचे शिक्षकायनो, अन् परुशी लोकांनो तुमच्यावर धिक्कार तुमी विधवा बायांच्या घराला लुटता, अन् लोकायले दाखव्यासाठी मोठं-मोठ्याने लंब्या प्रार्थना करत रायता, म्हणून तुमाले अधिक दंड भेटीन.
15हे कपटी मोशेच्या नियमशास्त्राचे शिक्षकायनो, अन् परुशी लोकायनो तुमच्यासाठी किती भयानक होईन, तुमी एका माणसाले आपल्या विश्वासात येण्यासाठी सगळ्या इकळे लंबी-लंबी पाण्यातून अन् रस्त्यानं प्रवास करता, अन् जवा तो तुमच्या विश्वासात येते, तवा त्याले आपल्या पेक्षा दुप्पट असा नरकात जाण्या लायक बनवता जसं कि तुमी स्वता हा.” 16“हे फुटके अगुवे लोकोहो तुमच्यावर धिक्कार जे म्हणता, कि जर कोणी देवळाची शपत खाईन, तरी काई नाई, पण जर कोणी देवळाच्या सोन्याची शपत खाईन, तो त्याच्यात बांधल्या जाईन.
17हे मुर्खानो, अन् फुटक्यानो, कोण मोठा हाय, सोन या ते देवूळ ज्याने सोन पवित्र होते, 18मंग म्हणता, कि जर कोणी देवळातल्या वेदीची शपत खाईन, तर काई नाई, पण जे भेट त्यावर हाय, जर त्याची शपत खाईन तर बांधल्या जाईन. 19हे मुर्खानो, अन् फुटके हो कोण मोठं हाय, भेट या वेदी, ज्याने भेट पवित्र होते? 20म्हणून, जो वेदीची शपत खातो, तो त्याची जे काई त्यावर हाय, त्याची पण शपत खातो. 21अन् जो देवळाची शपत खाते, तो त्याची व त्याच्यात रायनाऱ्याची पण शपत खातो.
22अन् जो स्वर्गाची शपत खाते, तो देवाच्या सिहासनाची अन् त्या सिहासनावर बसणाऱ्या देवाची पण शपत खातो.” 23“हे कपटी मोशेच्या नियमशास्त्राचे शिक्षकायनो अन् परुशी लोकायनो, तुमच्यावर धिक्कार तुमी पुदिना व सोपे अन् जिऱ्याचा दहावा भाग देता, पण तुमी नियमशास्त्राचे गंभीर गोष्टी सोडून देल्या, म्हणजे न्याय, दया, अन् विश्वासाले सोडलं हाय, पण तुमी ह्या करायच्या होत्या, त्या सोडायच्या नोत्या.
24तुमी बेकार मध्ये नियमाच पालन कऱ्याले सावधान रायता, तुमी जे पेता ते माशाय पासून दूर ठेवता, पण तुमी देवाची महत्वपूर्ण आज्ञाले तोडता, हे उंटाले गीवल्या सारखं हाय. 25हे कपटी मोशेच्या नियमशास्त्राच्या शिक्षकायनो, अन् परुशी लोकायनो तुमच्यावर धिक्कार तुमी असे भांडे हा जे बायरून तर साप हाय पण अंदरून अजून खराब हा म्हणजे तुमी स्वताले चांगल्या लोकायसारखे दाखविता पण तुमच्या मनात लोभ अन् स्वार्थ भरलेले हाय.
26हे फुटक्या परुशी, पयले आपल्या स्वताले लालची अन् स्वार्थी बण्याले नाई पायजे पण तुमाले धर्मी होयाले पायजे. 27हे कपटी मोशेच्या नियमशास्त्राच्या शिक्षकायनो, अन् परुशी लोकायनो तुमच्यावर धिक्कार, तुमी चुना लावलेल्या कबरेच्या सारखे हा, जे वरून तर चांगली दिसते, पण अंदरून तर मुर्दाच्या हड्या अन् सऱ्या प्रकारची मलीनता ने भरलेली हाय. 28अशाचं प्रकारे तुमी पण माणसांना धर्मी दिसता, पण अंदरून कपटाने अन् अधर्मी कामाने भरलेले हाय.”
शास्त्री अन् परुशी लोकायवर दंडाची भविष्यवाणी
(लूका 11:47-51)
29“हे कपटी मोशेच्या नियमशास्त्राच्या शिक्षकायनो, अन् परुशी लोकायनो तुमच्यावर धिक्कार, तुमी ज्या भविष्यवक्त्यायले मारले होते त्याच्या कब्रा सभाळता, अन् धर्मी लोकायच्या कब्रेला सन्मानित करता. 30अन् म्हणता, जर आमी आपल्या बापदादांच्या दिवसात असतो, तर आमी भविष्यवक्त्यायची हत्या करण्यात कधीच सहभागी झालो नसतो.
31यावरून तुमी आपलीच स्वताच साक्ष देता कि तुमी भविष्यवक्त्यायले मारणाऱ्यायचे लेकरे हा. 32आता तुमी आपल्या बापदादांच्या व्दारे सुरु केलेल्या कामाला पूर्ण करणारे लोकं हा. 33तुमी जे जहरील्या सर्पा सारखे अन् जहरील्या सर्पाच्या लेकराय सारखे हा, तुमी नरकाच्या न्यायापासून पडू नाई शकत.
34यामुळे पाहा, मी तुमच्यापासी भविष्यवक्त्यायले अन् ज्ञानी लोकायले अन् मोशेच्या नियमशास्त्राच्या शिक्षकायले पाठवतो, तुमी त्यायच्यातल्या कईकायले मारून टाकसान, अन् वधस्तंभावर चढवसान, अन् कईकायले आपल्या धार्मिक सभास्थानात फटके मारसान, अन् एका गावातून दुसऱ्या गावात पर्यंत त्यायले हाकलून द्यान. 35ज्याच्याच्यान धर्मी हाबिला पासून तर बिरीक्याहचा पोरगा जखऱ्या भविष्यवक्ता पर्यंत ज्यायले तुमी देवळाच्या वेदीच्या मधात मारून टाकलं होतं, जेवड्या धर्मी लोकायची तुमी हत्या केली हाय, त्याच्यासाठी तुमीच गुन्हेगार ठरसान. 36मी तुमाले खरं सांगतो, ह्या सगळ्या गोष्टी, या काळाच्या लोकावर येऊन पडेल.”
येशूचे यरुशलेमसाठी दुख
(लूका 13:34-35)
37“हे यरुशलेम शहराच्या लोकायनो, तुमी भविष्यवक्त्यायले मारून टाकता अन् ज्यायले तुमच्या पासी पाठवले होते, त्यायले गोटमार करता. किती तरी वेळ मले वाटलं, कि जशी कोंबडी आपल्या पिलांना आपल्या पंखाच्या खाली एकत्र करते, तसचं मी पण तुमच्या लेकरांना एकत्र करीन, पण तुमची इच्छा नव्हती.
38पाहा, तुमचं घर#23:38 घर घर हे यरुशलेमच्या देवळाले म्हतल्या गेलं हाय तुमच्यासाठी ओसाड सोडले हाय, 39कावून कि, मी तुमाले सांगतो, कि आतापासून जोपर्यंत तुमी नाई म्हणसान, धन्य हाय तो, जो प्रभूच्या अधिकारानं येतो, तवा पर्यंत तुमी मले परत कधी नाई पायसान.”

လက္ရွိေရြးခ်ယ္ထားမွု

मत्तय 23: VAHNT

အေရာင္မွတ္ခ်က္

မၽွေဝရန္

ကူးယူ

None

မိမိစက္ကိရိယာအားလုံးတြင္ မိမိအေရာင္ခ်ယ္ေသာအရာမ်ားကို သိမ္းဆည္းထားလိုပါသလား။ စာရင္းသြင္းပါ (သို႔) အေကာင့္ဝင္လိုက္ပါ